ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

पीसीयूचा रेड हॅटसोबत सामंजस्य करार पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये रेड हॅट अकादमीचा प्रारंभ 

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) पुणे, आणि आयटी क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रेड हॅट यांच्या मध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पिंपरी चिंचवड विद्यापीठात रेड हॅट अकादमी सुरु करण्यात येणार आहे. रेड हॅट ही लिनक्स प्रणालीवर चालणारी जगातली अग्रगण्य ओपन सोर्स सोल्युशन देणारी कंपनी आहे. या करारानुसार पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना रेड हॅटतर्फे आयटी कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उपयोगी असणारे प्रमाणपत्र देण्यात येणार असून पीसीयु – रेड हॅट अकादमी असे नामकरण करण्यात आले आहे. शैक्षणिक प्रशिक्षण आणि इंडस्ट्रीतील अंतर कमी करण्यासाठी पीसीयु रेड हॅट अकादमी काम करेल. आयटी क्षेत्रातील अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य विकसित करून प्रत्यक्ष कार्यानुभव मिळेल.  हा अभ्यासक्रम इंडस्ट्रीशी संलग्न असून अत्याधुनिक लॅब आणि प्रशिक्षक पुरवण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होईल आणि स्पर्धात्मक क्षेत्रात नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील.
पीसीयु – रेड हॅट अकादमीचा व्यापक अभ्यासक्रम –
पीसीयू रेड हॅट अकादमीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अभ्यासक्रम करण्याची संधी मिळेल. कोर सिस्टम एडमिनिस्ट्रेशन, क्लाऊड कॉम्प्युटींग, मिडलवेअर डेव्हलपमेन्ट. रेड हॅट सिस्टम एडमिनिस्ट्रेशन १ आणि २ द्वारे विद्यार्थ्यांना रेड हॅट एंटरप्राईजच्या लिनक्स प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्लाऊड कंम्प्युटींग अंतर्गत रेड हॅट ओपन स्टॅक एडमिनिस्ट्रेशन आणि ओपन शिफ्ट एप्लिकेशनच्या प्रशिक्षणाद्वारे क्लाऊड स्ट्रॅटेजीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मिडसवेअर डेव्हलपमेंटद्वारे पायथन प्रोग्रामिंग आणि जावा इइचा समावेश करण्यात आला आहे.
   जागतिक स्तरावर मागणी असलेली ओपन-सोर्स कौशल्ये प्रदान करणे, जागतिक प्रमाणपत्रांद्वारे रोजगार योग्यता वाढवणे, लवचिक, प्रत्यक्ष शिक्षण अनुभव प्रदान करणे, उच्च-गुणवत्तेचे अभ्यासक्रम सामग्री देणे ही पीसीयू-रेड हॅट अकादमीची उद्दिष्ट आहेत. विद्यापीठातर्फे आयटीक्षेत्रात करीयर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांना पीसीयु रेड हॅट अकादमीशी संलग्न होण्याचे आवाहन प्रभारी कुलगुरु डॉ. मणीमाला पुरी यांनी केले.
   विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीशी सुसंगत अभ्यासक्रम देण्यावर आमचा भर आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर आम्ही लक्ष देत आहोत. रेड हॅटसोबत झालेल्या या सामंजस्य करामुळे पीसीयुच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचे प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असल्याचे, मत प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे यांनी व्यक्त केले. कंप्युटर विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एन. पाटील व डॉ. दिलीप सैनी यांनी आगामी उपक्रमाची तयारी व संक्षिप्त सादरीकरण केले. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी https://www.PCU.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी‌‌ असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
    पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button