ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिशनतर्फे वकील बार रुममध्ये रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता. महान त्यागमूर्तीस विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी ॲड ज्येष्ठ विधज्ञ जे.के काळभोर,ॲड मुकुंद ओव्हाळ यांनी रमाई यांचे गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.ॲड.संजय जाधव, ॲड.भोंडे ॲड.अरुण खरात मामा, ॲड.बी.के कांबळे, ॲड.पदामावती पाटील,ॲड. पुनम शर्मा, ॲड.संगिता कुशलकर, ॲड. सि.एम माने, ॲड.निलेश टिळेकर, ॲड.अतुल कांबळे,ॲड. प्रताप साबळे, ॲड.नारायण थोरात, ॲड.प्रतिक जगताप, ॲड.कुलदीप बकाल यांनी शब्दरूपी अभिवादन केले.तसेच प्रथम महिला अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे यांनी माता रमाई यांनी वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही. आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्यात. रमाई आंबेडकर यांचा खडतर प्रवास सांगताना अध्यक्षा भावनिक होवून अश्रु अनावर झाले.अशाप्रकारे प्रत्येक महिलांनी रमाई चे गुण अंगीकृत करावे अशी भावना आपल्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे यांनी व्यक्त केली. उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, ॲड.ऐश्वर्या शिरसाठ, ॲड.तेजस चवरे, ॲड.विशाल पौळ. कार्यक्रमावेळी ॲड.सागर अडागळे, अड प्रशांत भडकुंभे,ॲड.हर्षद ओव्हाळ, ॲड.सूर्यकांत शिंदे, ॲड.विनोद आढाव, ॲड.रोहीत भोसले, ॲड.महेश गायकवाड वकील वर्ग मोठया प्रमाणात उपस्थीत होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.तेजस चवरे यांनी केले व आभार प्रदर्शन ॲड.विशाल पौळ यांनी केले.