जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
कर्तबगार चारित्र्यवान मुले कशी घडवावी हे जिजाऊंच्या संस्कारातून शिकावे – सुनिता शिंदे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्या काळात अन्याय अत्याचार वाढले होते.रयत दु:खी होती.त्या काळात राजमाता जिजाऊंनी आपला पुत्र शिवबा वर असे संस्कार केले की एक कर्तबगार, चारित्र्यवान पुत्र घडवला.स्वराज्याला रयतेचे हित रक्षण करणारा छत्रपती दिला.आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत हे राजमाता जिजाऊ चरित्रातून शिकावे असे प्रतिपादन जिजाऊ जयंती कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन साईधाम काॅलनी,चिंचवडेनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. प्रस्ताविक माणिक शिंदे यांनी केले.आभार शालन घाटूळ यांनी मानले. सूत्रसंचालन शितल घरत यांनी केले.कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली.आपल्या भाषणात शिंदे पुढे म्हणाल्या की लहानपणीच आई वारल्यामुळे शिवपुत्र संभाजी राजांवर संस्कार जिजाऊंनी केले.अशा रितीने आपल्या मार्गदर्शन व संस्काराने जिजाऊंनी स्वराज्यास दोन छत्रपती दिले.या प्रसंगी साधना शिंदे,सुनिता देशमुख,वनिता गायकवाड,धनश्री देशमुख, सुजाता सलगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माणिक शिंदे,शितल घरत,शालन घाटूळ,सविता अवचट,रेखा शिंगाडे,रंजना वाघमोडे,सतेजा मोरे,सरिता कोठावदे,रोहिणी काटकर,वैशाली मस्के यांनी केले होते.