पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे पिंपरी न्यायालयात शिवजयंती उत्साहात साजरी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे यावर्षीही पिंपरी न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरा करण्यात आली. आज बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतिराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महात्मा फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
पिंपरी न्यायालयात पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे पारंपरिक वाद्याच्या गजरात श्रींच्या पालखीची न्यायालय परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित वकिलांनी पारंपरिक वेषभूषा करीत भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या; तसेच मिरवणुकीदरम्यान पालखीवर पुष्पवृष्टी करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी न्यायालय परिसर दुमदुमून निघाला होता.



सदर कार्यक्रमासाठी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे, ॲड. रामराजे भोसले, ॲड. दिनकर बारणे, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. मदनलाल छाजेड, ॲड. राजेश पुणेकर यांचेसोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संगीता परब, ॲड. सुजाता बीडकर, ॲड. संभाजी बवले, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. चरेगावकर, ॲड. पल्लवी विघ्ने, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. विकास नेवाळे, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. राज जाधव, ॲड. योगेश थंबा, ॲड. नितीन तिडके, ॲड. ऋतुराज आल्हाट, ॲड. अजित खराडे, ॲड. आदित्य कोलपकर आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदुम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, सदस्य ॲड. राजेश राजपुरोहित, सदस्य ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सूर्यवंशी, ॲड. सीमा शर्मा यांनी केले.









