कन्या विद्यालयात एस एस सी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थीनींसाठी शुभचिंतन कार्यक्रम संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज सोमवार दिनांक १७/0२/२०२५ रोजी एस. एस. सी. परीक्षा मार्च २०२५ ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थिनींना परीक्षेस शुभेच्छा देण्यासाठी शुभ चिंतन कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.



या कार्यक्रमासाठी नितीन कोंढाळकर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. व महात्मा.फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले .
कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित अतिथिगणांचा विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ ऊर्मिला पाटील यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ स्वाती भंडारे यांनी शुभचिंतन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सातत्याने अभ्यास करत उत्तम यश संपादन करा असे मनोगत व्यक्त केले.
यानंतर इयत्ता दहावीच्या वर्गातील कु ऐश्वर्या अमृतकर, पौर्णिमा शिंदे, तनिष्का गायकवाड या विद्यार्थिनींनी शाळेतील सोनेरी दिवस, केलेला अभ्यास, विविध उपक्रमात घेतलेला सहभाग मिळवलेले यश याविषयी माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु प्राची खेडेकर हिने आपल्या मनोगतातून या शाळेने तुम्हा सर्व विद्यार्थिनींना ज्ञाना बरोबरच उत्तम असे संस्कार दिलेले आहेत, येथून जाणारी प्रत्येक विद्यार्थिनी ही शाळेचा अभिमान असावी. असे मनोगत व्यक्त केले.
यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ उपशिक्षक श्री प्रवीण राशीनकर व सौ अनघा रांगणेकर यांनी शिक्षक मनोगतामध्ये विविध कथा, अनुभव, उदाहरणे देत विद्यार्थिनींनी भावी जीवनात एक ध्येय समोर ठेवून ते ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत. विद्यार्थी दशेत च विद्या ग्रहण करण्यासाठी जेवढे कष्ट घ्याल तेवढे उज्ज्वल भविष्य निर्माण होईल.असा संदेश दिला.
यानंतर विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ ऊर्मिला पाटील यांनी ” चेहरा देव देतो ओळख आपण निर्माण करायची असते .”यासाठी सर्व विद्यार्थिनींनी अतिशय आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जाऊन उत्तम यश संपादन करत स्वतः चा आणि शाळेचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करा.असा संदेश दिला.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नितीन कोंढाळकर यांनी बालपणा पासूनच छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करत , अपार कष्ट करून स्वतः चा सुरू केलेला व्यवसाय व व्यवसायात घेतलेली गननभरारी मिळविलेले यश याविषयी माहिती देत मनोगत व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ श्री पांडुरंग भोसले सर यांनी विद्यार्थिनींनी आपल्या कार्य कर्तृत्वाने खूप मोठे होत आपले आई वडिल, शाळा त्याचबरोबर समाजाचे ही ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा. असे मनोगत व्यक्त करत एस एस सी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभसंदेश ही दिला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ ऊर्मिला पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ मीनल साकोरे यांनी केले व विद्यालयाचे उपशिक्षक श्री राजाराम राऊत यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.








