ताज्या घडामोडीपिंपरी

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली सर्वधर्म, समभावाची शिकवण – शिवशाहीर दस्तगीर अजीज काझी यांचे प्रतिपादन

Spread the love

पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित डांगे चौक,थेरगाव येथील शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे शहरातील विविध भागात आयोजन करण्यात आले होते. या विचार पर्वात थेरगाव येथील डांगे चौकात शिवशाहीर दस्तगीर अजीज काझी यांचा “छत्रपती शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टीकोन व जीवन चरित्र ” यांचे कथन करणा-या पोवाड्यांचा कार्यक्रम झाला.

यावेळी अजीज काझी यांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट आपल्या पहाडी आवाजात गात उपस्थित नागरिकांची माने जिंकली. ते यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेत स्वराज्य निर्मिती केली, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात प्रत्येक जातीधर्माचा सन्मान केला जात असल्याचे देखील आवर्जून सांगितले. काझी यांनी अगदी सोप्या शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा गुण,आदरभाव तसेच आपल्या मावळ्यांना सांभाळण्याचा गुण उपस्थिताना सांगितला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सकारात्मक दृष्टीकोनाबद्दल सांगताना चांगले मित्र शोधा, नकारात्मक विचार बदला , न्यायाने वागा,प्रत्येक काम ताबडतोब करा, चांगले काम मिळाल्यास त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा,सतत कार्यशील रहा, शिकत रहा,वाईट व्यसनांपासून दूर रहा असे विविध पैलू त्यांनी व्याख्यानांतून श्रोत्यांपुढे मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निवेदक किशोर केदारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button