रावेत भाग शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा कार्यक्रम संपन्न


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माध्यमिक विद्यालय केशवनगर भाग शाळा रावेत येथील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि 21 फेब्रुवारी रोजी सुरू होत असलेल्या एसएससी बोर्ड 2025 च्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
इयत्ता दहावीच्या निरोप समारंभाच्या व सदिच्छा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समोर येता दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या शाळेविषयी असलेल्या जुन्या सर्व आठवणींना उजाळा देत प्रत्येक शिक्षकाचे अनुभव, सर्व विद्यार्थ्यांशी सांगत अभ्यास करणे किती महत्त्वाचा आहे ? आम्ही सर्वजण येणाऱ्या परीक्षेमध्ये कसे जास्तीत जास्त गुण मिळू याबाबत त्यांनी सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांना आश्वासित केले.
भाषण करत असताना त्यांच्या एका डोळ्यामध्ये आनंद तर दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःख होते. कारण दहा वर्ष एका शाळेत शिक्षण घेतल्यानंतर आपण ती शाळा सोडून जातोय. यापुढे आपल्याला दहावीपर्यंत शिकवणारे शिक्षक नसतील आणि पुढील शिक्षणासाठी आपण जेव्हा बाहेर जाऊ त्यावेळी अशा पद्धतीने चांगली वागणूक देणारे शिक्षक नसतील. समजून घेणारी शिक्षक नसतील. कधीतरी रागावणारे शिक्षक नसतील . याची भावना त्यांच्या मनामध्ये दाटून येत होते . शालेय शिक्षण आणि शालेय शिक्षणातील शिस्त किती महत्त्वाची आहे ? याची जाणीव त्यांनी त्यांच्या मनोगतातून केली. पुढील आयुष्यामध्ये आपल्या शाळेची तसेच शाळेतील शिक्षकांची ओळख आणि जाणीव कायम ठेवून वागण्याची ही हमी त्यांनी दिली.
रावेत परिसराचे मा. नगरसेवक श्री. मोरेश्वर भाऊ भोंडवे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत दहावीच्या परीक्षेचे महत्त्व सांगून पुढील आयुष्यामध्ये शिक्षण किती महत्त्वाचे आहे? याबाबत सखोल असे मार्गदर्शन करून आपल्याकडे पैशासोबत उच्च शिक्षण किती महत्त्वाचे आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली व या वर्षीच्या परीक्षेमध्ये जे प्रथम तीन विद्यार्थी 80% पेक्षा जास्त गुण घेतील त्यांना दहा दहा हजार बक्षीस दिले जाईल . तसेच मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी 100% निकाल लावून मागील वर्षाचा इतिहास कायम ठेवतील अशी अपेक्षा करून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत येऊ घातलेल्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.



राजू घुले प्रशासनाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हितगुज करताना पालिकेने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बक्षीस योजना सांगून 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लखपती कसे होता येईल आणि शाळेचा शंभर टक्के निकाल लावून जास्तीत जास्त विद्यार्थी लखपती व्हावेत यासाठी खूपसार्या शुभेच्छा दिल्या.

रामदास चपटे मुख्याध्यापक केशवनगर ,श्रीमती शिकलगार मॅडम रावेत 97 च्या मुख्याध्यापिका दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी? तसेच परीक्षेमधील पेपर ताण न घेता कसे सोडावेत आणि परीक्षा कालावधीत अभ्यास कशा पद्धतीने करून परीक्षेला सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले. श्री पवार रामेश्वर भाग शाळा प्रमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना 21 तारखेपासून सुरू होत असलेल्या परीक्षेसाठी ताण तणाव विरहित पेपर कशा पद्धतीने लिहावेत . याविषयी मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका रूपाली कड, जाधव चारुशीला ,पांडुरंग घुगे ,वीर सुखदेव, शशिकांत चौधरी, सोनाली डुमणे म , सुनील विटकर मुख्य लिपिक धन्वंतरी विभाग, दहावीच्या वर्गशिक्षिका श्रीमती पूजा रोकडे, श्रीमती प्रज्ञा उके, श्री महेंद्र वानखडे व सेवानिवृत्त हेमंत साठे , या वर्गाच्या वर्गशिक्षिका सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम , नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थीच्या उपस्थित पार पडला.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी कुंभार या विद्यार्थिनीने केले व आभार प्रदर्शन मारिया शेख या विद्यार्थिनीने केले.








