निवृत्ती म्हणजे कामातील बदल – प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अध्यापन ही अध्यापकाच्या जीवनातील तरुण पीढिला घडविण्याची महत्त्वपूर्ण आणि आनंददायी प्रक्रिया आहे. मात्र नियत वयोमानानुसार निवृत्ती अटळ आहे. निवृत्ती म्हणजे सर्व कामकाजातून मुक्तता नसते. काही ना काही कार्य जीवनभर करावेच लागते, त्यामुळे निवृत्ती म्हणजे कामातील बदल असतो, असे प्रतिपादन मा. प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी केले.
प्रा. शहाजी मोरे व ग्रंथालय परिचर दत्तात्रय गणगे यांच्या सेवापूर्ती शुभेच्छा समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर होते.
महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी प्रा. शहाजी मोरे यांनी केलेल्या कार्याचा
लेखाजोखा प्राचार्य प्रो. डॉ. माधव सरोदे यांनी मांडला. तसेच प्राध्यापक मोरे यांनी विज्ञान क्षेत्रात सातत्याने लेखन केलेले आहे, मात्र यापुढील काळात समाजजीवनातील विविध प्रश्नांवर त्यांनी मांडणी करावी असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात प्रा. शहाजी मोरे यांनी रयत शिक्षण संस्थेसारख्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या भारतातील अग्रगण्य संस्थेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल संस्थेविषयी कृतज्ञता व मनस्वी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमात वैशाली मोरे, दत्तात्रय गणगे, डॉ. दत्तात्रय हिंगणे, डॉ. नीलकंठ डहाळे, उपप्राचार्य डॉ.मृणालिनी शेखर, उपप्राचार्य प्रा. अनिकेत खत्री, डॉ. तृप्ती अंब्रे, प्रा. लक्ष्मण जगदाळे, प्रा. अनिता तारळेकर, डॉ. कौस्तुभ मोरे, डॉ. पल्लवी मोरे, कौशिक मोरे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शुभदा लोंढे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. संग्राम गोसावी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रो. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. संग्राम गोसावी यांनी केले.