ताज्या घडामोडीपिंपरी
उन्नती सोशल फाऊंडेशनच्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -सामाजिक उपक्रमांत आघाडीवर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करून , उत्साहात साजरा करण्यात आला.
पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जग्गनाथ काटे , मेजर डी वाय एस पी श्री अनिल पवार , पोलीस हवालदार श्रीराम लहाटे, माजी सैनिक विनायक शिंदे , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे , आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष राजेंद्र नाथ जसवाल या मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा प्रदान करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “प्रजासत्ताक दिन हा भारताच्या लोकशाही मूल्यांचा उत्सव आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण सर्व समान आहोत आणि देशाच्या कारभारात आपला वाटा आहे. हा दिवस देशातील विविध जाती, धर्म आणि संस्कृतींना एकत्र येण्याची संधी प्रदान करतो. प्रजासत्ताक दिन आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे निर्मित संविधानाचे महत्त्व आठवून देतो, जे संविधान आपले अधिकार आणि कर्तव्ये यांचे रक्षणकर्ते आहे.”
या समारंभास , जगन्नाथ आप्पा काटे , विनायक शिंदे , डॉ.कुंदाताई संजय भिसे , संजय आबा भिसे , सुभाष चंद्र पवार राजेंद्र जयस्वाल , रमेश वाणी , अनिल पवार (नि.मेजर) , अशोक चव्हाण (नि. डीवायएसपी) , राम लहाटे (नि.हवालदार) , प्रेमलाल लांजेवार , डॉ.सौ. रश्मी मोरे (उपाध्यक्ष) , सखाराम ढाकणे सर (कार्यवाह) , शकुंतला शिंदे (अध्यक्षा) यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर परिसरातील देशप्रेमी नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.








