ताज्या घडामोडीपिंपरी

राहुल कलाटेंच्या विकासाचा रन वे सुसाट!, पाठपुराव्याला यश

Spread the love


पुनावळे, ताथवडे, वाकडमधील रस्त्यांना मंजुरी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील  नागरिकांना पायाभूत व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आग्रही असणारे, जनतेसाठी प्रशासनाशी कायम झगडणारे शहरातील युवा नेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी सतत्याने केलेल्या पाठपुराव्याला आणि मेहनतीला यश आले आहे. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वाकड, ताथवडे व पुनावळेतील महत्वाच्या अनेक डीपी रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
विकास आराखड्यातील रस्त्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे  वाकड, ताथवडे, पुनावळेतील महत्वपुर्ण डीपी रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे.  या भागातील वाहतूक कोंडीचे विघ्न आता टळणार असून पीएमआरडी हद्दीतील मावळ, मुळशीचा भाग, आयटी नगरी हिंजवडसह पिंपरी-चिंचवड शहराशी व शहारातील विविध महत्वपुर्ण
भागांशी कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार अससल्याने या भागातील स्थानिक रहिवासी व आयटीयन्सनी समाधान व्यक्त केले आहे.
भूमकर व भुजबळ चौकांसह या भागांतील
विविध रस्त्यांच्या विकास योजनांतील कायमच्या पक्क्या रस्त्यांच्या विकासामुळे नागरिकांचा जलद, आरामदायी आणि सुखकर प्रवास होणार आहे. प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. इंधन व वेळेच्या बचतीबरोबर मनस्ताप टळणार आहे. दळणवळणासाठी सुसज्ज असलेल्या रस्त्यांबरोबर सुरक्षित पदपथ (पेडेस्ट्रीयन फ्रेंडली फुटपाथ) उपलब्ध असतील. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोंडीला अजिबात वाव नसेल.

चौकट : ह्या रस्त्यांना लागणार थोडा वेळ

अन्य ठिकाणच्या विषयात ठेकेदाराने सिल्वर स्पून हॉटेल-इंदिरा कॉलेज, मधुबन हॉटेल-इंदिरा कॉलेज, सिल्वर स्पून हॉटेल-इंदिरा कॉलेज, वाकड शिव ह्या काँक्रीट रस्त्यांच्या कामाला नाहक न्यायालयात वेठीस धरल्याने त्या कामांना थोडा अवधी लागत आहे. मात्र, तो तिढा सुटत आला आहे. संपूर्ण प्रक्रिया पुर्ण होऊनही प्रत्यक्षात काम सुरु होण्यास काही कालावधी लागू शकतो. अन्य रस्त्यांच्या वर्क ऑर्डर निघून एक-दोन दिवसात प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार आहे.

प्रतिक्रिया

केंद्राच्या अख्त्यारीतील सेवा रस्त्यांसाठी देखील मी
केंद्रीय मंत्र्यांकडेही गाऱ्हाणे मांडले आहे. तर या भागातील रस्त्यांच्या पूर्ततेसाठी मी गेल्या दोन वर्षांपासून झगडतोय. सातत्याने विविध विभागांशी पत्रव्यवहार व आक्रमकपणे पाठपुरावा केल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वीच रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या आणि आता ह्या सर्व रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. हे जनतेसाठी अतिशय हितावह आहे.
– राहुल कलाटे
माजी नगरसेवक

असे आहेत रस्ते

मुंबई-बंगळुरू महामार्गापासून काटे वस्ती : ३० मीटर रुंद, २ किलोमीटर लांब

कोयते वस्ती चौक ते जांबेगाव : १८ मीटर रुंद, १.२५ किलोमीटर लांब

मधुबन हॉटेल ते इंदिरा कॉलेज : २४ मीटर रुंद व २.५० किलोमीटर लांब

ताथवडेतून जीवननगर मार्गे एमटीयू कंपनी रस्ता : १८ मीटर रुंद व ८०० मीटर लांब

बीआरटी रस्त्यापासून पुनावळे गावठाण रस्ता : १८ मीटर रुंद व १२०० मीटर लांब

वाकड टीपटॉप हॉटेल ते अटलांटा-२ सोसायटी : १८ मीटर रुंद व ८०० मीटर लांब

गायकवाडनगरमधील रस्ता : १८ मीटर रुंद व ७६० मीटर लांब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button