- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळचे तालुका संघटक, पवनानगरचे माजी उपसरपंच अमित कुंभार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कुंभार यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवा तालुका अधिकारी दत्ता केदारी, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे यावेळी उपस्थित होते. अमित कुंभार हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुका संघटक म्हणून काम पाहिले आहे. कुंभार समाजाच्या उन्नती, प्रगतीसाठी काम केले आहे. त्यांचे संघटन कौशल्य अतिशय चांगले आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. पवनानगर ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी पुन्हा…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक खासदार निधीतून मावळमधील काले कॉलनी, पवनानगर, ग्रुप ग्रामपंचायत कांब्रे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यात आले. खासदार बारणे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ, भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. खासदार बारणे यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये मावळात पुन्हा विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. मावळ तालुका वाड्या-वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचा अभाव होता. अंतर्गत रस्ते नव्हते. त्याकरिता खासदार बारणे यांनी मागील दोन टर्ममध्ये खासदार निधी आणि जिल्हा वार्षिक निधीतून मावळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते करण्यावर भर दिला आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले. समाज…
जनसंवाद यात्रेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या अडचणींवर सखोल चर्चा मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सोबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील प्रलंबित कामांबाबत बैठक घेतली या बैठकीत प्रामुख्याने मागील आठवड्यातील लोणावळा व खंडाळा परिसरात जनसंवाद यात्रेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या अडचणींवर सखोल अशी चर्चा करण्यात आली. लोणावळा शहरातील भांगरवाडी – नांगरगाव दरम्यान रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावणेसाठी एक महिन्यांच्या आत मोजणी करून भुसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, त्याचप्रमाणे ठेकेदाराने १५ मार्च २०२५ पूर्वी पुलाचे काम तातडीने चालू करण्याबाबत आदेश देखील देण्यात आले. तसेच लोणावळा शहरातील महात्मा फुले भाजी मंडईचे काम हे नगरपरिषदेच्या निधीतून करणेबाबत पुढील…
राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळा संपन्न पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “कथाकारांनी विश्व जाणिवेचे आव्हान पेलावे!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भाविसा सभागृह, भावे हायस्कूलमागे, सदाशिव पेठ, पुणे येथे केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक विलास सिंदगीकर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, बबन पोतदार, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणेचे अध्यक्ष डॉ. दीपक चांदणे यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. श्रीपाल…
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रशासन आपल्या दारी फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नागरिकांची बैठक आज कुदळवाडी विठ्ठल मंदिर येथे पार पडली. दिनेश यादव यांच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी , आरोग्य अधिकारी व इतर विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये मुख्यतः कचरा ,रस्ते सफाई आदी विषय होते. पण आता नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपला असताना कामचे चे पारंपरिक स्वरूप बदलून ती अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हायला हवी त्याच अनुषंगाने आपण काही महत्त्वाच्या मागण्या क्षेत्रीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. १. महिन्यातील १ बैठक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्ये घेण्यात यावी जिथे नागरिक आपल्या समस्या मांडू शकतील. २. प्रभागात कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज व क्विल हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा जनजागृतीचा उपक्रम गेले दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी पिंपरी चिंचवड शहर, रुपीनगर, तळवडे, लोणावळा परिसरातील शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई, नागरी वस्ती, बस स्थानके येथे प्रत्यक्ष जाऊन सायबर सुरक्षा बाबत मार्गदर्शन करून नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. या कार्याची दखल घेत, क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील आयोजित कार्यक्रमात त्यांना आठ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने २४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता डिजिटल मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या डिजिटल मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांचा समावेश असणार आहे. त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून वाचनवेल फाऊंडेशनच्या रुपाली सोनवणे, रीडर्स डायसच्या संस्थापिका तृप्ती मुंडे आणि लेखिका शीतल दरांदळ हे मान्यवर गुगल मीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार असून मराठी भाषेतील साहित्याच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन करणार आहेत. मराठी भाषा,…
पुणे बांबू महोत्सव-२०२५ चा प्रारंभ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “पुणे बांबू फेस्टिव्हल हा केवळ उत्सव नाही; तर तो हरित आणि शाश्वत भविष्याकडे एक पाऊल आहे. बांबूमध्ये उद्योगांमध्ये क्रांती घडवण्याची आणि समाज सशक्त करण्याची क्षमता आहे,” असे विचार बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे संचालक अजित ठाकूर यांनी मांडले. स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे बहुप्रतीक्षित पुणे बांबू महोत्सव २०२५ च्या तिसऱ्या हंगामाचे गुरुवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. महाराष्ट्र चॅप्टरच्या बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने व येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित हा ‘ग्रीन गोल्ड’ महोत्सव २३ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान रोज सकाळी १०…
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘आम्ही भारताचे लोक’ कार्यक्रमाचे आयोजन, १५० पेक्षा जास्त गायक – कलाकार होणार सहभागी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी तसेच भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ तसेच संविधानाला सांगीतिक मानवंदना देण्यासाठी आम्ही भारताचे लोक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नागरिकांना केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आम्ही भारताचे लोक ( हम भारत के लोग) हा कार्यक्रम रविवारी, २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पिंपरी येथील…
पिंपरी,( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल अंकुश कदम,अनिल कुऱ्हाडे,सागर देवकुळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्है आजादी दुंगा..’, ‘चलो दिल्ली..’, या घोषवाक्यांनी संपुर्ण देशवासियांच्या मनामध्ये स्वातंत्र्यलढ्याचे बीज…
