प्रशासन आपल्या दारी फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नागरिकांची बैठक : युवा नेते दिनेश यादव यांचा पुढाकार


चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रशासन आपल्या दारी फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नागरिकांची बैठक आज कुदळवाडी विठ्ठल मंदिर येथे पार पडली. दिनेश यादव यांच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी , आरोग्य अधिकारी व इतर विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये मुख्यतः कचरा ,रस्ते सफाई आदी विषय होते.



पण आता नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपला असताना कामचे चे पारंपरिक स्वरूप बदलून ती अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हायला हवी
त्याच अनुषंगाने आपण काही महत्त्वाच्या मागण्या क्षेत्रीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
१. महिन्यातील १ बैठक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्ये घेण्यात यावी जिथे नागरिक आपल्या समस्या मांडू शकतील.
२. प्रभागात कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची कल्पना नागरिकांना या बैठकीमध्ये देण्यात यावी. कामाच्या माहिती संदर्भातील सर्व तपशील काम चालू करण्यापूर्वी कामाच्या ठिकाणी लावण्यात यावे.
३. पूर्ण झालेल्या कामाचे ऑडिट करण्यात यावे.
४. कुदळवाडी परिसरातील वसाहतींमध्ये फायर ऑडिट करण्यात यावे.
आणि ह्या सर्वच मागण्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहेत व पुढच्या महिन्यापासून कुदळवाडीत मध्ये एक नागरिक मीटिंग चालू होण्याची शक्यता आहे.
अशा स्वरूपाचे काम सर्व आरोग्य क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नक्की होऊ शकते. आपापल्या भागात थोडा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.









