Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  देशामध्ये पाचशेहून जास्त कामगार संघटना आहेत. तसेच अनेक शेतकरी संघटना आहेत. यापैकी एकाही संघटनेची मागणी नसताना केंद्रातील भाजपाच्या सरकारने शेतकरी विरोधी आणि कामगारांविरोधी काळे कायदे कोणत्याही विरोधी पक्षांशी अथवा संघटनांशी चर्चा न करता विधेयकाव्दारे पास केले. स्वातंत्र्यापुर्वी आणि स्वातंत्र्यानंतर शेकडो कामगार संघटनांनी लढून काही संविधानात्मक अधिकार मिळविले होते. ते हक्क या मोदी – शहा यांच्या सरकारने एका रात्रीत रद्द केले. कामगारांना व कामगार संघटनांना जाचक ठरतील अशा अटी टाकून चार नविन कामगार कायद्यात त्यांचे रुपांतर केले. हे शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत अन्यथा अधिक तीव्र आंदोलन आगामी काळात केले जाईल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव आयोजित आणि मधुश्री कला आविष्कार, निगडी संयोजित राज्यस्तरीय खुल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर, चिंचवड या शाळेने सादर केलेल्या ‘बलम सामी’ या अभिवाचन प्रयोगाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे (रविवार, दिनांक ०२) रोजी प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ कवयित्री जयश्री श्रीखंडे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. सहाव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या राज्यस्तरीय खुल्या अभिवाचन स्पर्धेत एकूण १८ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाला तीस मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. सर्व सहभागी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘धार्मिक ऐक्य हेच संस्कृतीचे वैभव असते!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी  पुणे येथे )रविवार, दिनांक ०२) व्यक्त केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत ‘समग्र बाबा भारती’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ बौद्ध विचारवंत प्रा. दि. वा. बागूल अध्यक्षस्थानी होते; तर प्रा. डॉ. प्रकाश पगारिया, रजनी कानडे, अनिल सोनवणे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि बाबा भारती प्रतिष्ठान – पिंपरीचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  ‘समर्थ रामदासस्वामी यांनी मनावर ताबा मिळविण्याचे शिक्षण जगाला दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्यास विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण नगण्य होईल!’ असे मत विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी मॉडर्न शैक्षणिक संकुल, यमुनानगर, निगडी येथे रविवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यक्त केले. समर्थ भारत अभियान आयोजित आंतरशालेय ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अमित गोरखे बोलत होते. सज्जनगड संस्थान चिंचवड विभाग विश्वस्त जयंत कुलकर्णी, समर्थ रामदासस्वामी अभ्यासक विजय गाडगीळ, संयोजक डॉ. राजीव नगरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच पिंपरी – चिंचवड परिसरातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने समारंभात सहभागी झाले होते.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा यांच्या प्रेरणेने व कॉलेजच्या प्राचार्या वृंदा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स डे व अंतर महाविद्यालयीन परेड संचलन स्पर्धेचे आयोजन निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर करण्यात आले होते त्यात प्रथम क्रमांक विद्यानंद भवन द्वितीय एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव तर तृतीय क्रमाक विभागून पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर व प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांनी पटकाविले. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक ,सचिव डॉ दीपक शहा, खजिनदार डॉ भूपाली शहा, विद्यालयाच्या प्राचार्या वृंदा जोशी, प्रमुख पाहुणे आर्मी एअर…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विश्वकर्मीय समाज पिं-चिं शहर सामाजिक संस्था व सकल विश्वकर्मीय समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवानिमित्त भव्य रथयात्रा व मिरवणूक सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायं पाच ते आठ वा. या वेळेत काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत सुतार,लोहार, सोनार, शिल्पकार,तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक असलेल्या पंचरंगी ध्वजाचे अनावरण करण्यात आले. श्री.मानकर पुढे म्हणाले कि, सदरील मिरवणुकीचा मार्ग आकुर्डी खंडोबा मंदीर चौक ते प्रभू विश्वकर्मा मंदिर यमुनानर निगडी या मार्गाने असणार आहे. या भव्य दिव्य रथयात्रा व मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये वारकरी संप्रदायांमधील परंपरा…

Read More

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पिंपरी-चिंचवड दौरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडमधील विकासकामे आणि प्रलंबित प्रकल्पांना खोडा घालण्याचे काम करण्यात आले. मात्र, महायुतीच्या सत्ताकाळामध्ये शहराच्या विकासाला गती मिळाली. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी निश्चितच समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा उद्घाटन, भूमीपूजन तसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जाधववाडी, चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित केला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज मुंबई मध्ये महर्षी दयानंद महाविद्यालय सभागृह ( M. D. College ) परळ येथे सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती सलग्न सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा व बा.कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा २०२५ वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी एकुण सर्व वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामधील उल्लेखनीय काम करणार्‍या १०० जणांना पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पैलवान काळुराम लांडगे यांना धार्मिक , कला , क्रिडा , आरोग्य , पर्यावरण , सांस्कृतीक , शैक्षणिक , कृषी , राजकीय अशा विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय समाज कार्य असल्यामुळे त्यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणार ” साने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाकडून अनाधिकृत बांधकामावर न‍िष्कासनाची कारवाई सुरु आहे. गत सात द‍िवसात 416 अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली. या संदर्भात मा. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने निर्देश द‍िले होते. त्या अनुषंगाने गत सात दिवसापासून व‍िव‍िध भागातील अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस आयुक्तालय यांनी संयुक्तपणे वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी येथून धडक कारवाईला सुरूवात केली आहे. अनधिकृत बांधकामावर २९ जानेवारीपासून कारवाई करण्यात येत असून ०४/०२/२०२५ पर्यंत एकूण ४१६ वाहतुकीस अडथळा करणारे रस्त्यावरील अतिक्रमित…

Read More

कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील – कामगार नेते काशिनाथ नखाते पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे महामंडळकडून वर्षानुवर्षे कमी जास्त प्रमाणात लाभ मिळत गेला आता मात्र सुमारे पाच महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे बंद करून हे काम खाजगी ठेकेदाराला सुविधा केंद्र सुरू केल्याने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रचंड नुकसान होत होते कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र , कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केलेला पत्रव्यवहार तसेच पुणे,मुंबई, आणि नागपूर येथे केलेल्या आंदोलनामुळे बांधकाम कामगारांचे पोर्टल सुरू होऊन त्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली अशी भावना बांधकाम कामगारांनी आज व्यक्त केली. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे बांधकाम कामगारांचे…

Read More