ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड शहराचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांचा मुंबई येथे ” साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२५ ” ने सन्मान

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज मुंबई मध्ये महर्षी दयानंद महाविद्यालय सभागृह ( M. D. College ) परळ येथे सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती सलग्न सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा व बा.कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा २०२५ वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी एकुण सर्व वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामधील उल्लेखनीय काम करणार्‍या १०० जणांना पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पैलवान काळुराम लांडगे यांना धार्मिक , कला , क्रिडा , आरोग्य , पर्यावरण , सांस्कृतीक , शैक्षणिक , कृषी , राजकीय अशा विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय समाज कार्य असल्यामुळे त्यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणार ” साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२५ ” हा पुरस्कार सन्मानिय प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु व माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर  , कै.शिवाजीराव देशमुख सामाजीक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा चारुशिला देशमुख , अभिनेता व प्रसिद्ध दिग्दर्शक ( पावनखिंड ) प्रसाद भागवत , प्रसिद्ध सिने अभिनेत्री जयश्री गायकवाड , प्रसिद्ध सौंदर्य तज्ञ स्वाती ओक , मराठी सिनेनाट्य अभिनेत्री सुषमा सिनेलकर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , मेडल पदक देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी सोमनाथ गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषराव गायकवाड , शिवश्री व समाजसेवक विजय भोसले , प्रसिद्ध लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे , समाजभुषण व पोलीस मित्र दिलिप नारद , समन्वय समितीचे अध्यक्ष विजय केदासे , लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक अॅड. वर्षा देशपांडे हे उपस्थित होते यावेळी पुरस्कार्थींच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.

कार्यक्रम संपूर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व गायक सुरज भोईर व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरपुर प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button