पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी समवेत सामंजस्य करार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) स्कूल ऑफ सायन्सेसने शुक्रवारी युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी सोबत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात केला. युवाना वेलनेस ही संस्था संस्थापक, संचालक अदिती कुलकर्णी आणि सहसंस्थापक कुणाल खनाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध रुग्णालये आणि कॉर्पोरेट्सना मानसोपचार आणि सायकोमेट्रिक सेवा प्रदान करते.
यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ सायन्सेसच्या विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला आदी उपस्थित होते.
पीसीयु स्कूल ऑफ सायन्सेस मधील वेलनेस, क्लिनिकल सायकोलॉजी आणि संबंधित प्रकल्पांमधील अग्रगण्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विकास आराखडा तयार करून अंमलबजावणीसाठी हा करार उपयुक्त ठरेल असे मत विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला यांनी व्यक्त केले. हे विशेष अभ्यासक्रम हेल्थकेअर उद्योगाच्या विकसित होत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अनुभव आणि करिअरच्या संधी प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले जातील या करारासाठी प्रा. सन्निध्या मिसाळ यानी पुढाकार घेतला.
युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी सोबतच्या शैक्षणिक करारामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी होऊन वर्गातील शिकवण्यापासून अनुभवात्मक शिक्षणाकडे जाण्यास मदत करेल आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले.
युवाना तज्ञांबरोबर सह-शिक्षण, प्रशिक्षण तसेच संयुक्त प्रकल्प राबवले जातील डॉ. सुदीप थेपाडे यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला.
___________________________________