ताज्या घडामोडीपिंपरी

खासदार बारणे यांनी घेतले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला प्रारंभ केला आहे.

भाजप, शिवसेना महायुतीकडून मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत जाऊन आजी, माजी आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

दरम्यान, सोमवारी (दि. १) खासदार श्रीरंग बारणे यांनी अलिबागमधील रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार आणि महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

डॉ. आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांच्या भोवती सकारात्मक ऊर्जा आहे. या ऊर्जेची अनुभूती आजच्या या  भेटीत झाल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली

माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे मागील आठवड्यात निधन झाले. अलिबाग मतदारसंघातून त्या सन 1995, 1999 आणि 2009 अशा तीन वेळेला विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. त्या काही काळ राज्यमंत्री देखील राहिल्या. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, कार्यतत्पर, लोकाभिमुख नेतृत्व हरपले. खासदार श्रीरंग बारणे यांनी मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, आस्वाद उर्फ पपूशेठ पाटील आणि पाटील परिवाराचे खासदार बारणे यांनी सांत्वन केले.

महेंद्रशेठ दळवी यांच्या शुभेच्छा

खासदार बारणे यांनी आलिबाग विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दळवी परिवाराने  बारणे यांचे स्वागत केले आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button