न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये “जागतिक महिला दिवस व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन” साजरी करण्यात आली.


यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापक रूपाली सोंडे, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेतर्फे गेली दहा ते बारा वर्षांपासून महिलांची जनजागृती, सक्षमीकरण तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार दरवर्षी शाळेत केला जातो.
शाळेचे मुख्याध्यापिका रूपाली सोंडे यांनी आपल्या भाषणातून मातृत्व हे परमेश्वराने स्त्रीला दिलेले एक अतुलनीय वरदान आहे. एखादी स्त्री आई झाली तर तिची जबाबदारी निश्चितच वाढते. एक म्हणजे घरचे काम व बाळाचे संगोपन अशी दुहेरी जबाबदारी नोकरदार स्त्रियांसाठी नोकरी, घरचे काम व बाळाचे संगोपन अशी तिहेरी जबाबदारी. त्यामुळे ती स्वतःसाठी वेळी देऊ शकत नाही. “ज्या घरात मुली असतात ते घर सुख, समृद्धी व भरभराटीच्या मार्गावर असते. घरात प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी जपण्याचे काम कन्या ही लिल्या पार पडते असे म्हणतात ना, ‘सुख, समृद्धीची पेटी म्हणजे बेटी’, असे सांगितले.
तसेच शिक्षिका डिंपल काळे, गीतांजली दुबे आणि अनिता रोडे यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, इयत्ता १ लीची विद्यार्थिनी रिंशा जाजू हिने झाशीची राणी, कनिष्क कांबळे सावित्रीबाई फुले, इयत्ता ३री चे विद्यार्थी दीक्षा मोरे इंदिरा गांधी तसेच ४थी ची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी काटे हिने जिजामाता, पाचवीची विद्यार्थिनीं माही गायकवाड रमाई गायकवाड ,सहावीची विद्यार्थिनींनी श्रुष्टि साबळे यांनी वेशभूषा केली व माहिती सांगितली, तसेच अँजेल परिहार हिने आई होणे, आईला नेहमी मदत करणे या बद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा पवार व आभार रेणू राठी यांनी मानले.










