ताज्या घडामोडीपिंपरी

नको आम्हाला स्मार्ट मीटर ! कशाला करताय जबरदस्ती, नागरिकाचा आरोप

स्मार्ट मीटर जबरदस्ती बाबत सुहास कुदळे यांनी उठवला आवाज

Spread the love

कार्यकारी अभियंता यांना निवेदन…अदानी यांच्या कंपनीला दिलेल्या स्मार्ट मीटर व महावितरण खाजगीकरणाला विरोध.

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणकडून ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर लादले जात आहे.या निषेधार्थ आज दिनांक १० मार्च २०२५ रोजी कार्यकारी अभियंता यांना पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांची परवानगी न घेता त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असून,अनेक ग्राहक घरी नसतानाही जुन्या मीटरची तोडफोड करून नवीन मीटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत.

महावितरणच्या या धोरणाविरोधात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार ग्राहकांना त्यांच्या मीटर निवडण्याचा संपूर्ण हक्क आहे.मात्र महावितरणने हा कायदा डावलून जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे.ग्राहक घरी नसताना जर मीटर बदलले गेले. आणि जुन्या मीटरचा ठाठिकाणा लागत नसेल,तर यांस जबाबदार असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे.असेही स्पष्ट करण्यात आले आहे ,असे युवा सामाजिक कार्यकर्ते सुहास सुनंदा साहेबराव कुदळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

महावितरणचे खाजगीकरण झाले तर महावितरणमध्ये काम करणारे कर्मचारी यांना आता ज्या सरकारी योजना अथवा सवलती , फायदे घेता येणार नाही.कामाचा ताण वाढून कमी पगारात नोकरी करावी लागेल.यासाठी महावितरणचे खाजगीकरण होऊ नये. पिंपरीतील पहिला सामाजिक कार्यकर्ता असेल स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करणारे सुहास सुनंदा साहेबराब कुदळे होत. भविष्यात या संदर्भात स्थानिक नागरिक ,व्यापारी वर्ग तसेच पिंपरी परिसरातील सर्व नागरिकांची बैठक घेऊन जनआंदोलन कसे उभे करता येईल त्यावर चर्चा केली जाईल असे सुहास कुदळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button