ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरीतील जनतेने दिलेल्या साथीमुळेच आजवर चांगले काम करू शकलो – आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

 

अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आरपीआयचा मेळावा

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी मधील जनतेने मला कायम साथ दिली आहे. या विश्वासामुळेच आजवर नगरसेवक तसेच आमदार म्हणून चांगले काम करू शकलो. अनेक कामे पुढील काळात पूर्णत्वास न्यायची आहेत. त्यासाठी देखील पिंपरीतील मतदार राजा मला पुन्हा संधी देईल, असा विश्वास महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आरपीआय (आठवले) पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधताना आमदार अण्णा बनसोडे बोलत होते.

यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, दयानंद वाघमारे, बाबा सरोदे, ऍड गोरक्ष लोखंडे, नंदा खोचर, अंकुश कानडे, रामचंद्र माने, ईला ठोसर, लता ओव्हाळ, सम्राट जकाते, योगेश भोसले, अक्षय दुनगव, संजय सरोदे, दिलीप थोरात, दिनकर मस्के, संभाजी वाघमारे, बंडू वाघमारे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, मी सन 1997 मध्ये आनंदनगर मधून पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली. जनतेने मला चांगली साथ दिली. त्यानंतर महापालिका आणि विधानसभा अशा निवडणुका लढविल्या. तेव्हा देखील जनतेने वेळोवेळी मला चांगली साथ दिली आहे. या विश्वासामुळे मी आजवर चांगले काम करू शकलो.

सर्वांना हक्काचे चांगले घर मिळेल

अजंठानगर, दळवीनगर झोपडपट्ट्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जात आहे. सुरुवातीला यात आनंदनगर झोपडपट्टीचा समावेश नव्हता. आपण त्यामध्ये आग्रही भूमिका घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात आनंदनगरचा समावेश केला. आनंदनगरच्या बाबतीत अनेकांना घर मिळणार नाही. प्रकल्प रद्द होईल, अशी भीती घातली जात होती. पण तसे होणार नाही. प्रत्येकाला चांगले घर मिळेल. यासह पत्राशेड, लिंकरोड, दापोडी, फुलेनगर येथेही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीत आरपीआयचे बळ वाढणार

आरपीआय शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आरपीआयची आपल्याला कायम मदत झाली आहे. त्यामुळे या मदतीचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. या शब्दात अण्णा बनसोडे यांनी आरपीआय बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत आरपीआयला चांगल्या जागा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीच्या उमेदवारांचे काम करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आरपीआयचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जोमाने काम करत आहे. पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे यांच्या रूपाने आपले नेतृत्व पुन्हा विधिमंडळात पाठवायचे आहे.

बाळासाहेब भागवत म्हणाले, पक्षातील फितुरी बाबत रामदास आठवले यांच्याशी चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आरपीआय हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे. जे काम करणार नाहीत त्यांची यादी रामदास आठवले यांनी मागितली आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय आठवले यांच्याकडून घेतला जाणार आहे. अण्णा बनसोडे हे तळागाळात राहून काम करणारे नेते आहेत. प्रत्येकाशी आपुलकीने बोलून ते नागरिकांची कामे मार्गी लावतात. त्यामुळे हेच नेतृत्व पुन्हा विधानसभेत पाठवायचे असल्याचेही भागवत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button