Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग यांच्या नावाने पाणी पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार शहरामध्ये घडत आहेत. नागरिकांनी अशा बनावट एसएमएसकडे दुर्लक्ष करावे. तसेच बनावट एसएमएस पाठवणाऱ्या क्रमांकाची तक्रार सायबर पोलिसांकडे करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात सध्या ज्या मालमत्तेची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून करण्यात येत असते. परंतु सध्या महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने विविध मोबाईल क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा एसएमएसकडे दुर्लक्ष करण्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘केंद्रीय अर्थसंकल्प: २०२५-२६’ हा भारताच्या विकसित ध्येयपूर्तीच्या दिशेने जाणारा असून बारा लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच सदर अर्थसंकल्प संपूर्ण समाज घटकांना न्याय देणारा तसेच रोजगार निर्मितीला चालना देणारा आहे. ग्रामीण व शहरी भागासह सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून विकसित भारतावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे तसेच सामान्य जनतेच्या हातात पैसा राहील असा हा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले. प्रितम प्रकाश महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजीत ‘केंद्रीय अर्थसंकल्प :२०२५-२६’ यावर नुकतेच राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्या…

Read More

– राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा आणि जीवनचरित्रावर आधारित ‘‘छावा ’’ चित्रपट दि. 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून शिवभक्त आणि सिनेचाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहात चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. हिंदूत्त्वासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी राजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अधिकाधिक नागरिकांना पहायला मिळावा. त्याद्वारे शिव-शंभू विचारांचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्रभरात ‘‘छावा’’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भाजपा नेते तथा हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचे सुधारित अंदाजपत्रक आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर ठेवण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर ठेवण्यासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या विशेष सभेमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह मूळ अंदाजपत्रकाचे सादरीकरण करणार आहे. या अंदाजपत्रकात केंद्रशासनाच्या पुरस्कृत विविध योजना, प्रशासकीय सुविधा, विविध विकासकामे, भूमिपूजन, आरोग्य, स्थापत्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘आप्पा तांबे प्रीमियर क्रिकेट लीग’ (APL) या स्पर्धेचे भव्य व शानदार आयोजन करण्यात आले होते. रहाटणी परिसरातील सोसायट्यांसाठी श्री देविदास (आप्पा) तांबे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली होती, ज्यामध्ये पुरुष, महिला, मुले आणि मुलींचा समावेश होता. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच रहाटणी परिसरातील मुला-मुलींसाठी वयोगटानुसार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 90 हून अधिक सोसायटी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती: पुरुष व महिला गटासाठी: ट्रॉफी व रोख 150000 चे बक्षिसे देण्यात आली ही स्पर्धा…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा News14 Media Network सातत्याने जपते आहे. यावर्षीही ‘पिंपरी चिंचवड सन्मान २०२५’ पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले असून, ११ कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे. हा भव्य सोहळा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ७ वाजता ASM Group च्या CSIT पिंपरी येथील सभागृहात पार पडणार आहे. पुरस्कार विजेते: १) मा.श्री सोपानराव खुडे – जेष्ठ साहित्यिक 2) मा.श्री. प्रविण तुपे – प्रशासकीय सांस्कृतिक 3) मा.श्री. बाळासाहेब गायकवाड – बांधकाम व्यावसायिक 4) मा. डॉ. प्रकाश कोयाडे – कादंबरी लेखक 5) मा.श्री. मिलिंद कांबळे – पत्रकार 6) कु. प्रियंका इंगळे –…

Read More

इकॅम संस्थेच्या पिंपरी चिंचवड विभागीय शाखेची स्थापना पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील प्रत्येक घरात वीज पुरवठा देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. मेक इन इंडिया प्रकल्पाअंतर्गत सोलर सारखा अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवून, ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी विद्युत ठेकेदारांना खूप काम करावे लागणार आहे. विद्युत ठेकेदारांनी आता आधुनिकतेचा स्विकार केला पाहिजे. वेगाने वाढत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो, रस्ते, अनेक व्यावसायिक, निवासी बांधकाम प्रकल्प विकसित करण्यासाठी, शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी विद्युत ठेकेदार महत्त्वाचा घटक असणार आहे. विद्युत ठेकेदारांची इकॅम सारखी संस्था शहरात होणे आवश्यक होते असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. राज्यातील विद्युत ठेकेदारांच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र…

Read More

नवी दिल्ली/ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हशा, व्यंग्य आणि उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण अशी एक अविस्मरणीय संध्याकाळ मेघदूत ३ मध्ये अनुभवायला मिळाली, जेव्हा एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या थिएटर विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित २५ व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम) मध्ये कंजूस चे सादरीकरण केले. हे नाटक प्रसिद्ध फ्रेंच नाटककार मोलिएर यांच्या क्लासिक विनोदी नाटक द मायझर च्या हिंदी रूपांतरावर आधारित असून, थिएटर विभागाचे प्रमुख डॉ. अमोल देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. या प्रयोगाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. मोलिएर यांचे द मायझर हे १७व्या शतकातील अजरामर व्यंग्यात्मक नाटक असून, कंजूस मध्ये त्याचे कौशल्यपूर्ण रूपांतर करण्यात आले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) च्या प्र- कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांना प्रतिष्ठित विशालाक्षी पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषद २०२५ मध्ये हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रभावी नेतृत्व आणि उल्लेखनीय योगदानाप्रती त्याचा विशेष गौरव करण्यात आला. बेंगलोर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. हा पुरस्कार भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, या समारंभाला कर्नाटकचे राज्यपाल सन्माननीय श्री थावरचंद गहलोत, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी तसेच लोकसभेच्या सदस्य, प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृषी, वित्त आणि उत्पादन यासारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये भारत जलद गतीने प्रगती करत आहे. नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशात आरोग्य सेवा देखील प्रगतीपथावर आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे तंत्रज्ञान, डेटा ॲनालिटिक्स, आयओटी आणि फाईव-जी या आधुनिक संकल्पनेचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी मिशन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे प्रस्तावित राष्ट्रीय धोरण यामुळे तांत्रिक संशोधन, विकास आणि प्रयोगांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सायबर सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा यामध्ये भारत वेगाने प्रगती करत आहे. अशा क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी परिषद हे एक क्रांतिकारी महत्वपूर्ण पाऊल आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ञ अतुल कहाते…

Read More