डॉ.भाग्यश्री पाटील यांना प्रतिष्ठित ‘विशालाक्षी पुरस्कार २०२५’चा सन्मान
सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत प्रदान


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) च्या प्र- कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांना प्रतिष्ठित विशालाक्षी पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषद २०२५ मध्ये हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रभावी नेतृत्व आणि उल्लेखनीय योगदानाप्रती त्याचा विशेष गौरव करण्यात आला. बेंगलोर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.



हा पुरस्कार भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, या समारंभाला कर्नाटकचे राज्यपाल सन्माननीय श्री थावरचंद गहलोत, गुरुदेव श्री श्री रविशंकरजी तसेच लोकसभेच्या सदस्य, प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. विशालाक्षी पुरस्कार हा गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या मातोश्री विशालाक्षी देवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जातो. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या असामान्य महिलांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, “इतक्या मान्यवर महिलांच्या सान्निध्यात हा सन्मान मिळणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे आणि हा पुरस्कार शिक्षणाच्या परिवर्तनशील शक्तीवर शिक्कामोर्तब करतो. हा सन्मान मला शिक्षण क्षेत्रात अधिक सकारात्मक बदल घडवण्याचे बळ देतो.”
शिक्षण व उद्योजकतेत नेतृत्व साद्य करणारे व्यक्तिमत्व आहे.
डॉ. भाग्यश्री पाटील या शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आहेत. त्यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पिंपरीतील डॉ डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या त्या प्र-कुलपती आहे त्यांनी संस्थेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्या शिक्षकांना ज्ञान संपन्न आणि दूरदृष्टीशील बनवण्यास कटिबद्ध आहेत, कारण त्यांचा विश्वास आहे की गुरुजन हेच समाजाच्या प्रबोधनाचे खरे दीपस्तंभ आहे.
शिक्षणाबाहेरही त्यांनी राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. कृषी उद्योगाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयोगांबरोबर महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठी पावले उचलली आहेत. या कंपनीच्या त्या संस्थापक अध्यक्षा पदावर कार्यरत आहेत. त्यांनी या माध्यमातून फुलशेती, फलोत्पादन वनस्पती ऊतीसंवर्धन क्षेत्रात जागतिक अग्रगण्य बनले असून, ग्रामीण आर्थिक वाढीस हातभार लावत आहे आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन दिले आहे. त्या डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठाच्या कुलपती देखील आहेत.
महिला सशक्तीकरण व विविध क्षेत्रातील योगदानाचा गौरव
आंतरराष्ट्रीय महिला परिषद २०२५ मध्ये जगभरातील विविध क्षेत्रातील महिलाचा सहभाग होता. या परिषदेत विविध विषयांवर विचार मंथन झाले तसेच विविध क्षेत्रांतील आव्हाने आणि संधी यावर चर्चा झाली. याच परिषदेत उल्लेखनीय योगदान साद्य केलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये भाग्यश्री पाटील यांचा सन्मान शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीतील महत्त्व अधोरेखित करणारा आहे. या सोहळ्यात संगीता जिंदाल, पॅट्रिशिया स्कॉटलँड, अमला रुईया आणि स्मिता प्रकाश यांसारख्या प्रभावी महिलांनाही त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरवण्यात आले.








