स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘आप्पा तांबे प्रीमियर लीग’ (APL) स्पर्धेचे आयोजन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘आप्पा तांबे प्रीमियर क्रिकेट लीग’ (APL) या स्पर्धेचे भव्य व शानदार आयोजन करण्यात आले होते. रहाटणी परिसरातील सोसायट्यांसाठी श्री देविदास (आप्पा) तांबे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.



ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली होती, ज्यामध्ये पुरुष, महिला, मुले आणि मुलींचा समावेश होता. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच रहाटणी परिसरातील मुला-मुलींसाठी वयोगटानुसार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 90 हून अधिक सोसायटी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती:
पुरुष व महिला गटासाठी: ट्रॉफी व रोख 150000 चे बक्षिसे देण्यात आली
ही स्पर्धा मुला-मुलींसाठी पहिल्यांदाच आयोजित झाल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सर्व सहभागी खेळाडूंना श्री आप्पा तांबे यांच्या वतीने विशेष जर्सी देण्यात आल्या. विशेष म्हणजे, कोणत्याही संघाकडून प्रवेश शुल्क घेतले गेले नाही.
सर्व सहभागी संघांना ‘श्रीमंत योगी’ ची आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. मुला-मुलींच्या सहभागामुळे पालक, आजी-आजोबा आणि संपूर्ण कुटुंबांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्तम नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे प्रत्येक संघाने आयोजक आप्पा तांबे यांचे कौतुक केले.
विजेत्यांची नावे:
पुरुष:
1. दयाल हाइटस सोसायटी
2. साई विस्टा सोसायटी
3. रॉयल इलेगन्स सोसायटी
महिला:
1. भूमि क्षितिज सोसायटी
2. दयाल हाइटस सोसायटी
3. द्वारका क्वीन्स पार्क सोसायटी
मुली:
1. लीगसी ऑरा सोसायटी
2. ज्ञानगंगा सोसायटी
3. द्वारका क्वीन्स पार्क सोसायटी
या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार श्री शंकर शेठ जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करत श्री आप्पा तांबे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तिच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत संपूर्ण रहाटणी परिसरात ती चर्चेचा विषय ठरली. हल्ली मुलं खेळांपासून दूर जात असल्याचे चित्र पाहायला मिळते, मात्र या स्पर्धेमुळे त्यांच्या मनात खेळाची नवी ऊर्जा संचारली. पालकांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याची मागणी केली.








