प्रितम प्रकाश महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यस्तरीय चर्चासत्र
"विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने जाणारा अर्थसंकल्प - प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘केंद्रीय अर्थसंकल्प: २०२५-२६’ हा भारताच्या विकसित ध्येयपूर्तीच्या दिशेने जाणारा असून बारा लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच सदर अर्थसंकल्प संपूर्ण समाज घटकांना न्याय देणारा तसेच रोजगार निर्मितीला चालना देणारा आहे. ग्रामीण व शहरी भागासह सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून विकसित भारतावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे तसेच सामान्य जनतेच्या हातात पैसा राहील असा हा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले. प्रितम प्रकाश महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजीत ‘केंद्रीय अर्थसंकल्प :२०२५-२६’ यावर नुकतेच राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सामान्य घटकाला अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान निर्माण होईल असे या अर्थसंकल्पाची अशी रचना आहे.



चर्चासत्राचे मुख्य समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हनुमंत शिंदे यांनी प्रस्ताविक केले यामध्ये त्यांनी प्रस्तुत चर्चासत्रांतर्गत ‘केंद्रीय अंदाजपत्रक २०२५-२६’ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणकोणत्या तरतुदी केल्या असून त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर, नागरिक आणि विविध क्षेत्रावर कोणते परिणाम होणार आहेत याचा आढावा घेणे हा चर्चासत्राचा उद्देश असल्याचे सांगितले. चर्चासत्राचे उद्घाटन मा. सीए हर्षल लोढा केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात मा. सीए हर्षल लोढा यांनी हा अर्थसंकल्प हा सर्व समाज घटकांना न्याय देणारा आहे असे सांगून सेवा क्षेत्राअंतर्गत सामान्य लोकांना सर्व सेवा माफक दरात उपलब्ध होऊन विज्ञान तंत्रज्ञानातील प्रत्येक घटकापर्यंत सामान्य माणूस पोहोचू शकणार आहे. त्यामुळे ज्ञानात्मक रचना असणारा असा हा अर्थसंकल्प सामान्य लोकांना विचारात घेऊन तयार करण्यात आलेला असून तो खऱ्या अर्थाने सामान्य माणूस हा अर्थव्यवस्थेशी कसा एकरूप होईल त्याला अर्थव्यवस्थेमध्ये न्याय मिळेल, रोजगार उपलब्ध होईल, उत्पादनाला नवी बाजारपेठ निर्माण होईल अशी एकूण रचना असलेला हा अर्थसंकल्प आहे, असे मत व्यक्त केले.
चर्चासत्रातील प्रथम बौद्धिक सत्रात डॉ. हेमलता कावरे यांनी ‘२०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील शेती क्षेत्र आणि शाश्वत विकास’ या विषयावर तर डॉ. हेमकांत गावडे पाटील यांनी द्वितीय सत्रात ‘२०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल’ या विषयावर तर डॉ. अर्चना जाधव यांनी तृतीय सत्रात ‘औद्योगिक क्षेत्र आणि पायाभूत संरचना विकास आणि केंद्रीय अंदाजपत्रक २०२५-२६’ या विषयावर साधन व्यक्ती म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले तर चर्चासत्रासाठी प्रा. दीपक पावडे, डॉ. रश्मी ढोबळे, डॉ. ज्ञानेश्वर फड , प्राचार्य डॉ. सुनील पवार हे सत्राध्यक्ष म्हणून लाभले होते.
समारोपाच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स’ बोर्डाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मा. प्राध्यापक डॉ. किशोर निकम यांनी एकदिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये सहभागी झालेल्या उपस्थितांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच सदर चर्चा सत्रांतर्गत समन्वयक डॉ. हनुमंत शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या शोध निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा या उपक्रमांबद्दल विशेष अभिनंदन केले. चर्चासत्रा दरम्यान डॉ. स्वाती वाघ, प्रा. सचिन पवार, प्रा. विभा ब्राह्मणकर, प्रा. पांडुरंग भास्कर, प्रा. सुधाकर बेसाणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे काम केले. डॉ. विजय निकम, प्रा. राजेश कुंभार, कु. हरीश पोळ कु . स्वाती निकाळजे कु. ऋषिकेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. चर्चासत्रात ७५ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले असून त्यांना २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध बाबी तरतूदीचे सखोल ज्ञान प्राप्त झाले.

चर्चासत्राचे उद्घाटन करत असताना प्रा. डॉ. अशोककुमार पागारिया व सीए हर्षल लोढा तसेच डॉ. हनुमंत शिंदे, डॉ. विजय निकम, डॉ. स्वाती वाघ, प्रा. रेणू अगरवाल, प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा. पांडुरंग भास्कर आणि ग्रंथपाल श्री. राजेश कुंभार आदी मान्यवर.
सीए हर्षल लोढा यांचा सन्मान करतांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पागारीया व्यासपीठावर डॉ. हनुमंत शिंदे, डॉ. स्वाती वाघ, प्रा. रेणू अगरवाल आदी मान्यवर.
मा. प्राध्यापक डॉ. किशोर निकमयांचा सन्मान करतांना चर्चासत्राचे मुख्य समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हनुमंत शिंदे व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुनील पवार,डॉ. अर्चना जाधव, प्रा. सचिन पवार, प्रा. पांडुरंग भास्कर, डॉ. स्वाती वाघ, प्रा. रेणू अगरवाल आदी मान्यवर.
चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पागारीया व्यासपीठावर डॉ. हनुमंत शिंदे, सीए हर्षल लोढा, डॉ. स्वाती वाघ, प्रा. रेणू अगरवाल आदी मान्यवर.
समारोपाच्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स’ बोर्डाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मा. प्राध्यापक डॉ. किशोर निकम मार्गदर्शन करतांना व्यासपीठावर डॉ. हनुमंत शिंदे, प्राचार्य डॉ. सुनील पवार, प्रा. सचिन पवार, प्रा. पांडुरंग भास्कर आदी मान्यवर.
चर्चासत्रात पोस्टर्स प्रदर्शन स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी मान्यवरांसह, डावीकडून डॉ. रश्मी ढोबळे, डॉ अर्चना जाधव, डॉ. हेमलता कावरे, डॉ. अशोककुमार पागरिया, डॉ. हनुमंत शिंदे, डॉ. हेमकांत गावडे पाटील, डॉ. प्रवीण पोतदार, प्रा. दीपक पावडे, प्रा. विभा ब्राह्मणकर, डॉ स्वाती वाघ, प्रा. सुधाकर बैसाने, प्रा. सचिन पवार आदी मान्यवर.
चर्चासत्रात समारोप प्रसंगी प्रमाणपत्र वितरनानंतर उपस्थित मान्यवरांसह सहभागी झालेले विद्यार्थी डावीकडून प्रा. राजेश कुंभार, डॉ. आबासाहेब शिंदे, डॉ. हनुमंत पिसे, डॉ अर्चना जाधव, डॉ. रश्मी ढोबळे, डॉ. हेमकांत गावडे, प्रा. पांडुरंग भास्कर, डॉ. हनुमंत शिंदे, प्रा. सचिन पवार, डॉ. किशोर निकम, प्राचार्य डॉ. सुनील पवार, डॉ. प्रवीण पोतदार, प्रा. दीपक पावडे, प्रा. सुधाकर बैसाने, डॉ. हेमलता कावरे, डॉ. स्वाती वाघ, प्रा. विभा ब्राह्मणकर, ज्योती खरातमोल, प्रगती कुदळे आदी मान्यवर.








