पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्कारांची घोषणा, २२ फेब्रुवारीला पार पडणार सन्मान सोहळा


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा News14 Media Network सातत्याने जपते आहे. यावर्षीही ‘पिंपरी चिंचवड सन्मान २०२५’ पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले असून, ११ कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे. हा भव्य सोहळा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ७ वाजता ASM Group च्या CSIT पिंपरी येथील सभागृहात पार पडणार आहे.



पुरस्कार विजेते:

१) मा.श्री सोपानराव खुडे – जेष्ठ साहित्यिक
2) मा.श्री. प्रविण तुपे – प्रशासकीय सांस्कृतिक
3) मा.श्री. बाळासाहेब गायकवाड – बांधकाम व्यावसायिक
4) मा. डॉ. प्रकाश कोयाडे – कादंबरी लेखक
5) मा.श्री. मिलिंद कांबळे – पत्रकार
6) कु. प्रियंका इंगळे – खो-खो खेळाडू (भारत कॅप्टन)
7) मा.श्री. देवदत्त कशाळीकर – प्रसिद्ध फोटोग्राफर
8) मा.श्री. पंकज सोनवणे – VFX प्रोड्युसर
9) मा.श्री. वसंत गुजर – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
10) श्रीमती आशा पांचपांडे – शैक्षणिक (जीवन गौरव)
11) इन अथलेटिक सोसायटी – सामाजिक संस्था
विशेष सन्मान:
यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवणाऱ्या ‘सुलतान’ या लघुपटाच्या संपूर्ण टीमचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते मा. मुरलीकांत पेटकर असतील. तसेच, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजेभोसले, पुणे महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखरसिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मावळचे खासदार संसदरत्न मा. श्रीरंग आप्पा बारणे, खासदार अमोल कोल्हे, आमदार शंकरभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, आण्णा बनसोडे, उमाताई खापरे आणि अमित गोरखे यांची उपस्थिती लाभणार आहे.
सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन
News14 Media Network चे संचालक व संपादक अविनाश कांबीकर यांनी शहरवासीयांना या गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम समाजाच्या विविध स्तरांतील योगदानशील व्यक्तींना प्रोत्साहन देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.








