
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संजय वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
चेअरमन संदीप काटे आणि व्हाईस चेअरपर्सन अनिता काटे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्राचार्या ज्योतिका मलकानी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून स्वतःच्या हातांनी सुंदर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.
या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व परंपरेसोबतच सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून देण्यात आले. पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
‘बाप्पा घडवूया प्रेमाने, पर्यावरण जपूया मनापासून!’ या संदेशातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प व्यक्त केला.

















