
संघर्ष मित्र मंडळाच्या गणरायाची आमदार अंबादास दानवेंच्या हस्ते आरती
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संघर्ष मित्र मंडळ, रहाटणी येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख चेतन पवार, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, विकास एकशिंगे, अरुण हुमानबाद, प्रदीप दळवी, गणेश भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपशहर संघटिका ज्योती भालके, तस्लिम शेख, विभाग संघटिका कलावती नाटेकर, वंदना खंडागळे, उपविभाग संघटिका शितल तापकीर, निकेशा भोसले यांच्यासह संघर्ष मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















