
वंचित,पारधी आणि भटक्या -विमुक्त विद्यार्थ्यांनबरोबर गुणवंत कामगार कल्याण मंडळाची दिवाळी साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेतील विद्यार्थ्यांना दिपावली निमित्त फराळ, सुवासिक तेल, उटणे कपडे व टॉवेल वाटप करण्यात आले.संस्था नेहमीच दिपावलीच्या निमित्ताने वंचित, दुर्बल,दुर्लक्षीत घटकांना सामाजिक भावनेतून मदत करत असते.आपण या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो. या प्रमुख उद्देशाने प्रेरित होऊन संस्थेच्या संस्थापिका/ अध्यक्षा डॉ.भारतीताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत आहे.आपण इकडे तिकडे न जाता आपल्या शहरात असलेल्या संस्थेला मदत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संस्थेच्या कार्याची माहिती देताना श्री.देशपांडे सरांनी सांगितले “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड” ही संस्था
शतकानोशतके उपेक्षित राहिलेल्या
वंचित, पारधी आणि भटक्या-विमुक्त समुदायातील मुलांच्या उन्नतीसाठी व उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करते.संस्थेची स्थापना २००९ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी केली।उपेक्षित घटकातील मुला-मुलींना इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते.तसेच त्यांच्या निवासाची मोफत सोय केली आहे.पारंपरिक कला व कौशल्य विकास पुस्तकी ज्ञानासोबतच या मुलांमधील अंगभूत पारंपरिक कला, हस्तकला आणि कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविले जाते.आपण केलेली ही मदत फार महत्त्वाची आहे.तसेच मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पवना नदीला पूर आला होता.संस्था नदीतीरी असल्यामुळे महापुरामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गोमातांना चारा दान केल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महमंदशरीफ मुलाणी यांनी केले.डॉ.भारतीताई चव्हाण यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन श्रीकांत कदम यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके,किरण देशमुख, श्रीकांत कदम, संदिप पोलकम, संदिप रांगोळे,काळुराम लांडगे,सतिश देशमुख यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी एकोंडे, राजेश हजारे,संजय गोळे,भरत शिंदे, महेंद्र गायकवाड, शिवराज शिंदे, शिवाजी पाटील, शंकर नाणेकर, अशोक सरपाते, अण्णा गुरव, नंदकुमार धुमाळ, रघुनाथ फेगडे यांनी सहकार्य केले.



















