
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील पर्व साक्षी सोसायटीमध्ये ४५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सन ओशन सोलर कंपनी आणि पर्व साक्षी सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे होते. यावेळी चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन संदीप काटे, पुणे हाऊसिंग फेडरेशनचे कोषाध्यक्ष तसेच सोसायटीचे चेअरमन प्रदीप कुलकर्णी, भास्कर निकम, राजेश कुकरेजा, केतन नारखेडे, आनंद पाठक, मिथिलेश ठकुराल, प्रफुल्ल कोमलवार यांच्यासह सोसायटीतील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौर ऊर्जेचा वापर वाढविणे, पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे या दृष्टीने सोसायटीचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



















