
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते केली निवड जाहीर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी प्रकाश जाधव यांची निवड जाहीर. मराठा सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक ऑन लाईन पार पडली.या बैठकीस सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष व संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हजर होते.यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी प्रकाश जाधव यांची सर्वानुमते निवड जाहीर केली.
प्रकाश जाधव हे मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात जुने कार्यकर्ते आहेत.आजवर त्यांनी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पुणे जिल्हाध्यक्ष केरल राज्य प्रभारी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ( दक्षिण भारत) उद्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच सहकार क्षेत्रात मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन चे संचालक धर्मवीर संभाजी अर्बन को.ऑप.बॅंकेचे उपाध्यक्ष व संचालक पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष व संचालक इत्यादी विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे संघटनेतील व सहकारातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघाने त्यांची निवड केली आहे प्रकाश जाधव यांच्या वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

















