ताज्या घडामोडीपिंपरी

औद्योगिक कायझेन स्पर्धेत 72 कंपन्यांचा सहभाग

Spread the love

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने एमआयडीसी भोसरीतील कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर मध्ये औद्योगिक कायझेन स्पर्धा 2025 घेण्यात आली. या स्पर्धेत 72 कंपन्या मधून 735 स्पर्धकांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी ,पोस्टर, घोषवाक्य यात स्पर्धकांनी सहभाग नोंदवीत विविध संघाने त्यांच्या कंपन्यात केलेल्या सुधारणा सादर केल्या. सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून उद्योग व शिक्षण क्षेत्र यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील 60 विद्यार्थी या स्पर्धेला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील तज्ञांशी संवाद यावेळी साधला.

कार्यक्रमाचे उद्घाटन क्लोराईड मेटल्स लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर व प्लांट हेड राजलक्ष्मण आर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी कॉलिटी सर्कल फॉर्म ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर, कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर, माधव बोरवणकर आणि विजया रुमाले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पुणे येथील नेक्स्टीअर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक माधव कुलकर्णी, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष विक्रम साळुंखे उपस्थित होते . त्यांचा फोरमच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.त्यांच्यासमवेत कौन्सिल सदस्याच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत 190 केस स्टडी,60 पोस्टर्स आणि 55 घोषवाक्य समवेत या स्पर्धेत एकूण 305 संघांचा सहभाग होता.

अजय कुमार अंबिके, अनंत चिंचोळकर, चंद्रशेखर बापट , दत्तात्रेय मु-हे , जी एल घाटोल, हनुमंत टिकेटे , महेंद्र मगदूम, पवन कुमार रौंदळ, प्रशांत मुधलवाडकर , रितेश खन्ना, संपत खैरे, शिरीष शहाणे ,व्यंकटेश राव ,व्यंकटेश पेड्डी, विनय पाटील यांनी केस स्टडी चे मूल्यमापन केले .घोषवाक्य आणि पोस्टरचे मूल्यमापन माधव बोरवणकर आणि प्रकाश यार्दी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले तर आयोजन रहीम मिर्झाबेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रूमाले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button