Author: maharashtrabreakingnews.com

एमआयटी एडीटी’ विद्यापीठात विश्वनाथ स्पोर्ट मिट-२०२४ स्पर्धेला प्रारंभ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असताना ऑलिंपिकमधील पदकांची संख्या नक्कीच खटकणारी आहे. त्याचमुळे भारतातील क्रीडा संस्कृतीला सरकारच्या खेलो इंडिया, फिट इंडिया, टाॅप्स(टार्गेट ऑलिंपिक पाॅडियम) सारख्या महत्वाकांक्षी योजनांतून चालना देण्यात येत आहे. २०३६ मधील ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी सरकार प्रयत्नशिल असून त्यामाध्यमातून भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय आहे,” असे मत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे(साई) प्रादेशिक संचालक पांडूरंग चाटे(आयआरएस) यांनी व्यक्त केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजीत विश्वनाथ स्पोर्ट मिट(व्हीएसएम-२०२४) या वर्षातील सर्वांत मोठ्या राज्यस्थरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी माईर्स एमआयटी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाची दमदार कामगिरी सुरूच असून दहा महिन्यात तब्बल सातशे काेटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. उर्वरित दोन महिन्यात जास्तीत-जास्त कर वसूल करण्यासाठी विभागाने आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जिथे सील करता येणे शक्य नाही त्या ठिकाणी जप्त’ करण्याचा प्रथमच मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी त्वरित कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख 15 हजार मालमत्ता आहेत. यापैकी तब्बल 4 लाख 21 हजार मालमत्ता धारकांनी 716 कोटी 40 लाख रूपयांचा भरणा करून शहर विकासात योगदान दिले आहे. त्याबद्दल पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी या जबाबदार आणि जागरूक करदात्यांचे मनस्वी आभार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- केंद्र शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम ‘’आयुष्मान भव’’ मोहिमेंतर्गत १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरूषांच्या आरोग्य तपासणीकामी महापालिकेच्या रुग्णालय तसेच दवाखान्यांमधील बाह्यरुग्ण विभागातील सर्व केसपेपर, औषधोपचार आणि तपासण्या मोफत करण्यासाठी आज प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह तळवडे येथील आ. क्र. १/५२ व १/५३ येथे बायोडायव्हर्सिटी पार्क आरक्षण विकसित करण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी (मुलींचे) येथे डिजीटल स्मार्ट रूम आणि आवश्यक अनुषंगिक बाबी यांचे कामकाज टर्न की प्रोजेक्टनुसार करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर, चिंचवड येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयामध्ये मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक भाऊसाहेब पठारे हे होते. सामाजिक कार्यकर्ते कैलास दुर्गे, वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, सचिव राजाराम वंजारी, जेष्ठ संचालक राजगोंडा पाटील, राजेंद्र पगारे, भरत गायकवाड, मनीषा पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांचे *”मराठी भाषा : काल-आज-उद्या”* या विषयावर व्याख्यान झाले. पाहुण्यांचे स्वागत मनीषा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी केले. राजेंद्र घावटे म्हणाले की, “भाषा एक संवादिनी आहे. एका भाषेचा दुसऱ्या भाषेबरोबर समन्वय पूर्वापर चालत आलेला आहे. पूर्वी संस्कृत भाषा, नंतर…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा गेली २५ वर्षे सातत्याने पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुप यांचे संयुक्त विदयमाने कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृती निमित्त राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेचे आयोजन करते. यावेळी  कै. राम गणेश गडकरी स्मृती, कोहिनूर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी विविध केंद्रावर घेण्यात आली होती. त्याचा निकाल शुक्रवार दि. २६ जानेवारी सायंकाळी ७ वा. एकत्रित पणे जाहीर करण्यात आला. या  स्पर्धेत एकूण ५५ संघांनी यामध्ये भाग घेतला होता. नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवड अश्या विविध केंद्रावर हि स्पर्धा पार पडली. या स्पर्धेची अंतिम फेरी हि प्रा. रामकृष्ण…

Read More

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेच्या अंतकरणात विविध संप्रदायातील साधू ,संत यांनी निर्माण केलेल्या विश्वबंधुतांच्या विचार जागतिक स्तरांवर लोकांच्या मनात रुजवले हिंदू,मुस्लिम, शीख, ईसाई – हम है सारे भाई भाई…असा मानवतेचा संदेश गांधींनी दिला शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन व आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यासह विदेशात अनेकांचे आदर्श झालेले महात्मा गांधीजी यांनी विश्वबंधुत्वाचे विचारांची पेरणी केली असे मत राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त केले पिंपरी चिंचवड येथील कार्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, अमोल भंडारी, नंदा क्षीरसागर, सलीम डांगे,अशोक क्षीरसागर,ओमप्रकाश मोरया,महादेवी शेंडगे,सविता जगताप, बिरदेव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त 1 म्हणून एका दिवसासाठी कु .दुर्गा अभय भोर अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह उपायुक्त जांभळे पाटील तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी दुर्गा भोर यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि प्रशासकीय कामकाजाची माहिती त्यामुळे उत्तम प्रकारे मिळाली आणि हा एक आयुष्यामधील खूप मोठा प्रसंग आहे आणि त्याचं नक्कीच पुढील काळामध्ये मी चांगला प्रकारे काम करून समाजाच्या सेवेसाठी वापर करून…

Read More

प्रभाग क्र २८ रहाटणी – पिंपळे सौदागर ते पिंपरीला जोडणाऱ्या जुन्या पुला लगत नविन समांतर पुल बांधण्यात येत असुन आज या कामाची पाहणी माजी विरोधी पक्षनेते  विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबंधीत मनपा अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत केली. या पाहणी दरम्यान संबंधितांना सुचना केल्या की या पुलाचे काम करत असताना पिंपरीच्या  बाजुने शेवटच्या स्लॅब चे काम गेली अनेक दिवस  काम संथ गतीने सुरू आहे ते काम लवकरात लवकर पुर्ण करावे तसेच या पुलावरून ये – जा करणाऱ्या वाहनाची वर्दळ जास्त असुन नागरिकांना  वाहतुकीच्या खोळंबण्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे, त्याबाबात देखील योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, तसेच या पुलाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राहुरी येथील वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकीली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड.राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड.मनीषा आढाव हे दाम्पत्य गुरुवारी दिनांक २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याबाबत कळाले . सदर वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली ही अतिशय निंदनीय बाब असल्याने याचा निषेध म्हणून आज पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील वकील पुरुष बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सदर वकिल दाम्पत्य हत्येचा तीव्र शब्दात सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती मध्ये हिंदू मातंग समाज लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असून जन्मा पासूनच हिंदू असल्याचा अभिमान हा समाज बाळगून आहे ,महाराष्ट्रात मातंग समाजाची ताकद जास्त असून सुद्धा आजवर कुठल्याही पक्षाने मातंग समाजाला राज्यसभा अथवा विधान परिषदेवर संधी दिलेली नाही, तरी पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेतील सहा जागापैकी महाराष्ट्रातील जागेवर मातंग समाजातील कुठल्याही नेत्याचा विचार करून मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी मातंग समाजाचे नेते तथा सा. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे . त्यांच्या मागणीनुसार मातंग समाजातील कुठल्याही…

Read More