शासकीय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर अविवाहित, घटस्फोटीत, विधवा मुलींना कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार – उमा खापरे
आमदार उमा खापरे यांच्या लक्षवेधी सुचनेला मिळाले यश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासकीय, निमशासकीय सेवेत असलेल्या किंवा सेवानिवृत्तीचा लाभ घेत असलेल्या आई-वडिलांच्या निधनानंतर वारसा हक्काने त्यांच्या पश्चात २४ वर्षावरील अविवाहीत, घटस्फोटीत, विधवा मुलींना कुटुंब निवृत्तीवेतन देण्याबाबत केंद्र शासनाचे नियम राज्य सरकार तपासून बघेल व केंद्र शासनाप्रमाणे नियम करुन मुलींना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याचा विचार करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत नुकतेच दिले. त्याप्रमाणे 8 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होऊन केंद्र सरकार प्रमाणेच हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला. त्याबद्दल आमदार उमा खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आभार मानले.
याबाबत बोलताना आमदार उमा खापरे म्हणाल्या,
केंद्र सरकारच्या शासकीय सेवेत असलेल्या मृत आई वडिलांचे कुटुंब निवृत्ती वेतन त्यांच्या अविवाहित घटस्फोटीत व विधवा मुलींना वय वर्ष २४
नंतर ही चालू राहावे हा कायदा प्रथम पासून आहे. याच प्रमाणे महाराष्ट्र सरकार ही हा नियम लागू व्हावा अशी मागणी प्रतिभा दिगंबर कुलकर्णी चिंचवड यांनी आमदार उमा खापरे यांच्याकडे केली. या प्रकरणाचा अभ्यास करून आमदार उमा खापरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्या प्रमाणेच कार्यवाही होऊन दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ अधिसूचना जारी होऊन केंद्र सरकार प्रमाणेच हा कायदा आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रगत महाराष्ट्रात लागू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अविवाहित विधवा व घटस्फोटीत मुलींचे भविष्य सुखकर व सुरक्षित झाले आहे. त्याबद्दल सरकारच्या या महिलाबाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी स्वागत केले आहे.