Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत विद्यार्थिंनीबरोबर विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभागी होत पाककौशल्यात आपणही सरस असल्याचे सिद्ध केले. क्रीडा स्पर्धांतर्गत शेवटच्या दिवशी पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे वेगवेगळे दहा गट यामध्ये सहभागी झाले होते. तीन दगडांची चूल मांडून, शिधा आणि पूरक साहित्य सोबत घेऊन खिचडी, पुलाव, पराठे, भजी, पोळीभाजी या नेहमीच्या जेवणातील पदार्थांसोबतच मिष्टान्न तयार करून आपण भावी काळातील सुगरणी आणि बल्लवाचार्य असल्याचे सहभागींनी सिद्ध केले. याबाबत अधिक माहिती…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  कशिश प्रस्तुत “गझल संध्या – चुपके चुपके” या हिंदी – मराठी गझलांच्या सुरेल मैफलीने निगडी प्राधिकरणातील  आय. आय. सी. एम. आर. ऑडिटोरियममधील गझलप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पं. किरण परळीकर, शर्मिला शिंदे आणि प्रतीक म्हाळस्कर यांच्या स्वरातील काही लोकप्रिय तर काही नव्या ताज्या गझलांचा उपस्थित रसिकांनी रसास्वाद घेतला. मूळ फारसी काव्यप्रकार असलेली गझल ही लिखित विधा गायनाच्या माध्यमातून जेव्हा रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचून उत्स्फूर्त दाद मिळवते तेव्हाच ती पूर्णत्वाला जाते, असे म्हटले जाते. याचा पुरेपूर प्रत्यय या मैफलीत आला. मैफलीची सुरुवात उर्दू आणि मराठी शायरीचे दीपस्तंभ असलेल्या गालिब आणि सुरेश भट यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे प्रा. योगेश विनोद भावसार यांना पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. भावसार यांनी “भारतीय उत्पादन क्षेत्रातील दीर्घकालीन एकीकरणाचे आर्थिक कामगिरीचे विश्लेषण” या विषयावर शोधप्रबंध सादर केला. डॉ. भावसार हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) या संस्थेमध्ये रजिस्ट्रार व ओएसडी या पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांचा वरील विषयावर आधारीत शोधप्रबंध तुर्की येथे ऑनलाईन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. डॉ. लिना डाम यांचे मार्गदर्शन लाभले.     या पदवी प्रदान सोहळ्यात बालाजी विद्यापीठाचे कुलपती परमानंदम यांच्या हस्ते डॉ. भावसार यांना पदवी प्रदान करण्यात आली.…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या सन २०२४-२५ च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पिंपरी न्यायालयात पार पडला. नवीन कार्यकारिणीची निवडणूक शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी झाली आणि या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी माघार घेतली असल्याने पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिवपदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदाच्या तिरंगी लढतीत ॲड. अनिल पवार यांनी भरघोस मते मिळवत विजयाला गवसणी घातली. सदर निवडणूक ही बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी नेमलेले निरीक्षक ज्येष्ठ विधिज्ञ  ॲड. श्रीकांत अगस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर पदग्रहण समारंभासाठी…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- येथील एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात येत्या मंगळवारी (१७ डिसेंबर) फिट इंडिया सायकलिंग मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. विद्यापीठातील तत्वज्ञानी संत श्री. ज्ञानेश्वर विश्‍वशांती घुमटाच्या परिसरातून या मोहिमेची सुरुवात होईल. ज्यात सहभागींना ३,५ आणि १० किलोमीटर प्रकारात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या मोहिमेचे एमआयटी इम्पॅक्ट विद्यार्थी परिषद, भारतीय क्रिडा प्राधिकरण(साई) व लोणी-काळभोर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेले आहे. जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” या संकल्पनेशी सुसंगत आहे. या मोहिमेला माउंटन ब्रिगेडचे माजी कमांडर आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डचे माजी फोर्स कमांडर ब्रिगेडियर व्ही. महालिंगम (निवृत्त) यांच्या प्रमुख…

Read More

संविधान के सन्मान में पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन वकील उतरे मैदान में पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी नेहरूनगर कोर्टात परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी आणि त्यामागील सूत्रधार यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा . संविधान हे देशाचे सर्वोच्च स्थानी आहे त्यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तिवर कडक कारवाई करावी तसेच देशाच्या संविधानाची विटंबना होणार नाही यासाठी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.परभणी येथे घडलेल्या घटनेचा काळी फित लावून जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होते. परभणी येथे संविधानाचा अपमान करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी दिनांक १४/१२/२०२४ रोजी सकाळी…

Read More

नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांचा सत्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजप प्रणित केंद्र सरकार संविधान बदलतील असा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच देशांमध्ये आतापर्यंत ७२ वेळा संविधानात बदल केला. 1975 मध्ये देशामध्ये आणीबाणी संविधानाचा अवमान केला. संविधान निर्मितीचे काम केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत दोन वेळा पाडण्याचे काम काँग्रेसने केले, अशी टीका माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी शुक्रवारी केली. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप यांचा शाल, श्रीफळ, पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला.…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये विमा सखी योजनेचा शुभारंभ महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी नवा मार्ग पिंपळे गुरव,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला एलआयसीचा विमा सखी योजने मुख्य उद्देश महिलांना विमा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. महिलांना मानधनासह रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून त्यांना समाजात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वाचे योगदान देईल, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या एलआयसीच्या विमा सखी योजना पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच लागू करण्यात आली असून, याचा शुभारंभ पिंपळे गुरव येथील आमदार शंकर जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तथा चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी दिपक नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली.. या प्रसंगी भाजपा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, भाजपा प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राज तापकीर उपस्थित होते..

Read More

जागतिकस्तरावर अद्ययावत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णांची काळजी या क्षेत्रांत प्रगतिपथावर राहता यावे, या उद्देशाने डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र पिंपरी, पुणे यांनी ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन (बीएपीआयओ) या ब्रिटनमधील प्रख्यात प्रशिक्षण संस्थेशी धोरणात्मक सहकार्य केले आहे. या भागीदारीमुळे वैद्यकीय शैक्षणिक उत्कृष्टता, नवं नवीन संशोधन आणि जागतिक आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रगतीसाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जागतिकस्तरावर वैद्यकीय शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरीने रुग्ण व  आरोग्य सेवा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बद्दल घडविण्याच्या उद्देशाने ही भागीदारी महत्वपूर्ण मानली जात आहे. या भागीदारीमुळे देशातील एक…

Read More