परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाचा अवमान करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी


संविधान के सन्मान में पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन वकील उतरे मैदान में



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी नेहरूनगर कोर्टात परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी आणि त्यामागील सूत्रधार यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा . संविधान हे देशाचे सर्वोच्च स्थानी आहे त्यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तिवर कडक कारवाई करावी तसेच देशाच्या संविधानाची विटंबना होणार नाही यासाठी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.परभणी येथे घडलेल्या घटनेचा काळी फित लावून जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होते.

परभणी येथे संविधानाचा अपमान करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी दिनांक १४/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्व वकील बंधू आणि भगिनींच्या वतीने नेहरूनगर येथील न्यायालयात निषेध करण्यात आला यावेळी मा. अध्यक्ष ॲड.नाना रसाळ मा.अध्यक्ष ॲड.प्रमिला गाडे मा. अध्यक्ष ॲड.सुनिल कडुसकर मा.अध्यक्ष ॲड.किरण पवार मा.अध्यक्ष ॲड. सुदाम साने,मा. उपाध्यक्ष ॲड.प्रतीक जगताप मा. उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, जेष्ठ विधीज्ञ ॲड.बी.के.कांबळे , ॲड.नवीन वालेचा, ॲड.नारायणा थोरात, ॲड.तेजस चवरे ॲड.पल्लवी कुऱ्हाडे ॲड.प्रशांत भडकुंभे ॲड.सागर पोवार ॲड.मुस्तफिज शेख ॲड. राज जाधव ॲड. जितीन ठांनबीर ॲड. डॉ.अनिरुध्द गायकवाड ॲड. प्रताप साबळे ॲड. राज जाधव ॲड. एन एम गर्जे,ॲड. साक्षी जिरवनकर.अध्यक्ष ॲड.पांडूरंग विठ्ठल शिनगारे उपाध्यक्ष ॲड. अजय रामसुमेर यादव, सचिव ॲड. संदिप भाऊसाहेब तापकीर, महिला सचिव ॲड. संगीता रमेश कुशलकर, सहसचिव ॲड. पदमावती लक्ष्मण पाटील , खजिनदार पदी ॲड. विशाल आसाराम पोळ , हिशोब तपासनीस ॲड. प्रेरणा हरेश चंदानी, सदस्य ॲड. विजय धोंडिराम भोंडे, ॲड. अक्षय कमलाकर चौधरी, ॲड. आरती दत्तात्रय कुलकर्णी, ॲड. पौर्णिमा भगवान मोहिते, ॲड. रूपाली रामचंद्र पवार , ॲड. सुषमा सुदर्शन पाटील उपस्थित होते यावेळी माजी अध्यक्ष नाना रसाळ यांनी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षा आणि पावित्र जपण्याची जबाबदारी ही आपणा प्रत्येकाची आहे कारण या दोन महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करूनच महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जातो तरी सदर महापुरुषांच्या पुतळ्यांचे पावित्र्य व सुरक्षितता राखण्याचे काम हे शासनाचे तसेच प्रत्येक नागरिकाची व आपणा सर्वांची आहे
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड विशाल पोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.संगिता रमेश कुशलकर यांनी केले








