Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आकुर्डी वाल्हेकरवाडी परिसरामध्ये स्थापन करण्यात आलेल्या खाऊ गल्ली (फूड कोर्ट) हे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील फेरीवाल्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. आता महापालिका श्रीमंत आणि धनिकांसाठी मोठी रक्कम आकारून त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे ते रद्द करून सर्वसामान्य विक्रेत्यांना यामध्ये समावेश करून सदरचे गाळे देऊन मूळ उद्देश साध्य करावा अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे . नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पदाधिकारी यांनी आज आकुर्डी येथील नियोजित खाऊ ( फूड कोर्ट) याला भेट देऊन पाहणी…

Read More

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या बातमीचा इम्पेक्ट पिंपरीतील ‘त्या’ मैदानातील स्टेडियमवर विदयुत दिवे बसवले सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळेंच्या मागणीला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपरीगावातील नव महाराष्ट्र विद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालयासमोरील खेळाच्या मैदानात प्रेक्षकांसाठी बनविण्यात आलेले यशवंतराव चव्हाण स्टेडियममधील समस्यांबाबत महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज  बातमी  मागील पाच दिवसापूर्वी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तातडीने दखल घेत विद्युत विभागाच्या वतीने या मैदानातील संपूर्ण स्टेडियममध्ये विद्युत दिवे बसविण्यात आले आहे. पिंपरीतील या मैदानात दोन मोठे तर १ लहान स्टेडियम आहे. शाळा आणि कॉलेजचा परिसर असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांनी हे स्टेडियम गजबजलेले असते.त्याचबरोबर सकाळी-संध्याकाळी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू, नागरिक या मैदानात मोठ्या संख्येने…

Read More

मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनसंगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराना घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या ‘अभंगरूपी’ स्वर्गीय गायनाने संपूर्ण चिंचवड परिसर भक्तीरंगात न्हाऊन निघाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संगीत रसिकांनी स्वरचिंब अनुभूती घेतली. चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ३६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या भक्तिसंगीत आणि अभंगवाणी या शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव विद्वांस, स्वप्नील देव, स्वानंद मोकाशी, सत्यजित मुंगी यांच्या हस्ते पंडित जयतीर्थ मेवुंडी…

Read More

श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोकमान्य टिळकांना नेहमीच त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या आडनावावरून लक्ष्य करण्याचे काम तत्कालीन इंग्रज सरकार आणि विरोधकांनी केले. टिळक म्हणजे ब्राम्हणी वर्चस्ववादी विचारांचे नेतृत्व असा अपप्रचार त्यांच्याबद्दल केला गेला. मात्र या देशासाठी एक स्वतंत्र जबाबदार सरकार असावे व त्याची निवड ‘एक व्यक्ती, एक मत’ या प्रक्रियेतून व्हावी, असा विचार त्यांनी सर्वप्रथम मांडला. यामध्ये कुठेही जातीभेद न करता सर्वांना समान हक्क असावा. व त्यासाठी देशाला स्वतंत्र राज्यघटना व लोकशाही असावी अशी भूमिका मांडणारे देशातील पहिले नेतृत्व लोकमान्य टिळक हे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश…

Read More

भक्तिगीते, युगुलगीते, लावणी, चित्रपटगीतांनी रंगली सुरांची मैफिल श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित सुगमसंगीताचा कार्यक्रमास संगीतरसिकांची उत्स्फूर्त दाद चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठीसह हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटक्षेत्रातील आघाडीची सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल जादुई आवाजाची मोहिनी चिंचवडकरांनी अनुभवली. त्यांनी गायलेल्या भक्तिगीते, युगुलगीते, लावणी आणि चित्रपटगीतांची बहारदार गाण्यांची मैफिल गुरुवारी (दि. १९ डिसेंबर) रात्री चिंचवड येथे रंगली होती. श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, देवराज डहाळे यांच्या हस्ते बेला शेंडे…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अल्पसंख्यांक बांधवांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म आणि परंपरांचे संवर्धन करता यावे यासाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी,पालकांसमवेत नागरिकांमध्येही अल्पसंख्यांक हक्क दिवसाची जागृती करण्यात आली. त्या दृष्टीकोनातून  विद्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून अशा उपक्रमातून अल्पसंख्यांक बांधवांच्या हक्कांचे संवर्धन करण्यात येत आहे असे प्रतिपादन शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी केले.             पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण उर्दू प्राथमिक शाळेमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकला, निबंध व वकृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदवला होता, यामधील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात…

Read More

– बांगलादेशी, रोहिंग्यांवर कारवाई मागणी, प्रशासनाची थेट ‘पाडापाडी’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी- चिखली या भागातील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड, भंगार दुकानांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. भंगार दुकानांमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटना आणि बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बेकायदा वास्तव्याबाबत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले आणि दोनच दिवसांत ‘बुलडोझर’ कारवाई सुरू झाली आहे. पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.०२ मधील मोरे-पाटील चौक ते कुदळवाडी पोलीस चौकी येथे १८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (३०० मीटर लांबी ) व कुदळवाडी पोलीस चौकी ते विसावा चौक या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्रातील मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी शास्त्रीय निकषांवर आधारित तर्कशुद्ध आणि न्याय्य धोरण अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात ‘‘झीरो बाय ३०’’ चे उद्दीष्ट साध्य करायचे असेल, तर अँटिरेबीज लस आणि रेबीज एँटीसिरमच्या उपलब्धतेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी आग्रही मागणी महायुती सरकारकडे केली आहे. यावर निश्चितपणे सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी-चिंचवडसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भेडसावणारा मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे आमदार लांडगे यांनी महायुती सरकारचे लक्ष वेधले. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना भारतात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर होत आहे.…

Read More

‘एमआयटी एडीटी’त फिट इंडिया सायकलिंग मोहिम पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात आपण शाररिक स्वास्थ्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहोत. त्यामुळे, अगदी तारुण्यातील मुलांना हृदयविकाराचे झटके आल्याचे आपण सध्या पाहतो. नोकरी, पैसा, करिअर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहोतच, मात्र त्याहूनही शारीरिक स्वास्थ्य अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे, तरुणांनी विद्यार्थी दशेतच सायकलींग करून व्यायामाची आवड जोपासल्यास त्यांचे हृदय अधिक बळकट होऊन आयुर्मान वाढण्यास मदत होईल,असे मत, माउंटन ब्रिगेडचे माजी कमांडर तसेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचे माजी फोर्स कमांडर ब्रिगेडियर व्ही. महालिंगम (निवृत्त) यांनी मांडले. ते येथील एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाची एमआयटी इम्पॅक्ट विद्यार्थी परिषद, भारतीय क्रिडा प्राधिकरण (साई)…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  “नववर्षाच्या स्वागतोत्सवात अंमली पदार्थांवर आळा घालावा!” असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद, विधी प्रकोष्ठाचे वतीने,पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी पोलीस आयुक्त, पुणे व पोलीस आयुक्त पिंपरी – चिंचवड यांना केले. शिक्षणाचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातील अल्पवयीन तरुण – तरुणींना अगदी सहजपणे अंमली पदार्थ उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या २०२५ या नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने महाविद्यालयातील तरुण आणि तरुणी कुतूहल अन् आकर्षणापोटी अंमली पदार्थांच्या वाट्याला जातात. ही बाब हेरून तरुण पिढीला अंमली पदार्थ सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणून अंमली…

Read More