महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या बातमीचा इम्पेक्ट पिंपरीतील ‘त्या’ मैदानातील स्टेडियमवर विदयुत दिवे बसवले


महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या बातमीचा इम्पेक्ट पिंपरीतील ‘त्या’ मैदानातील स्टेडियमवर विदयुत दिवे बसवले



सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळेंच्या मागणीला यश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरीगावातील नव महाराष्ट्र विद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालयासमोरील खेळाच्या मैदानात प्रेक्षकांसाठी बनविण्यात आलेले यशवंतराव
चव्हाण स्टेडियममधील समस्यांबाबत महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज बातमी मागील पाच दिवसापूर्वी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तातडीने दखल घेत विद्युत विभागाच्या वतीने या मैदानातील संपूर्ण स्टेडियममध्ये विद्युत दिवे बसविण्यात आले आहे.
पिंपरीतील या मैदानात दोन मोठे तर १ लहान स्टेडियम आहे. शाळा आणि कॉलेजचा परिसर
असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांनी हे स्टेडियम गजबजलेले असते.त्याचबरोबर सकाळी-संध्याकाळी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू, नागरिक या मैदानात मोठ्या संख्येने येत असतात. व विरंगुळा
म्हणून या स्टेडियममध्ये बसतात.
मात्र रात्रीच्या वेळी या स्टेडियममध्ये कोणतीही विजेची सोय नसल्याने याठिकाणी अंधार पडत असे.तसेच सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यानेया अंधाराचा गैरफायदा घेऊन आसपासच्या परिसरातील दारुडे आणि चरस, गांजा पिणारे चरसी या स्टेडियममध्ये बसून दारू व गांजा पित असत. त्याचा नाहक त्रास विद्यार्थी आणि नागरिकांना होतो.
त्याचबरोबर याठिकाणी रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी येणाऱ्या महिला व मुलींसाठीही ही धोक्याची बाब होती. यासंदर्भात पिंपरी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी आवाज उठवला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सर्व स्टेडियममध्ये विद्युत दिवे बसविण्यात आले असून लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कुदळे यांनी सांगितले.








