ताज्या घडामोडीपिंपरी

महापालिकेच्यावतीने अल्पसंख्यांक हक्क  दिन उत्साहात साजरा

Spread the love

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अल्पसंख्यांक बांधवांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म आणि परंपरांचे संवर्धन करता यावे यासाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी,पालकांसमवेत नागरिकांमध्येही अल्पसंख्यांक हक्क दिवसाची जागृती करण्यात आली. त्या दृष्टीकोनातून  विद्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून अशा उपक्रमातून अल्पसंख्यांक बांधवांच्या हक्कांचे संवर्धन करण्यात येत आहे असे प्रतिपादन शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी केले.

            पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण उर्दू प्राथमिक शाळेमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकला, निबंध व वकृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदवला होता, यामधील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्याद्यापिका सय्यद शहेदा जैनूलआबेदीन, यशवंतराव चव्हाण कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले,  उप शिक्षिका उस्ताद बिबिहाजरा जंगबहादूर, खान रईसा मन्नान, शेख यास्मिन अन्सार, खान आसिया शब्बीर, कारागिर समीना आफरीन मो.हुसेन, मोमीन मुसर्रतजहॉ आरिफ अहमद,  बागवान शाजीया मोहम्मद शरीफ, शेख जीनत समद, नसरीन बानो मोहम्मद सुलतान,सय्यद शबाना इकबाल तसेच सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख, कमरुद्दीन खान, मोहम्मद सानियाल, मोहम्मद शकील, शहनाज शेख यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

“कभी खुशियो से, तो कभी गमो से मुलाकात हुई है, ऐसे लम्हो से ही जिंदगी लाजवाब हुई है” अशा शेरोशायरी करून विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला. तसेच अल्पसंख्यांक हक्क दिन, मायनारिटी राईटस डे  अशा आशयाची सुबक चित्रे देखील विद्यार्थ्यांनी रेखाटले होते.

८२४ विद्यार्थी संख्या असलेल्या थेरगाव उर्दू शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात . यामध्ये शाळापूर्व तयारी मेळावा, योग दिवस, पालक सभा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन, वाचन प्रकल्प,शिक्षण सप्ताह , डी.बी.टी. साहित्य वाटप कार्यक्रम, मासिक कलस्टर मुख्याध्यापक सभा, स्वातंत्र्य दिवस, सखी सावित्री दामिनी पथक सहविचार सभा  , महावाचन उत्सव, बालवाडी क्लस्टर मिटिंग, तंबाखू मुक्त शाळा, शिक्षक दिवस, महान स्त्री-पुरुषांची जयंती,   सिरतुन्नबी कार्यक्रम, मानसिक आरोग्य दिन, वाचन प्रेरणा दिन, दिवाळी कार्यक्रम, बाल दिवस, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, तास कवितेचा, अपार आयडी दिवस, शिष्यवृत्ती सराव दिवस, अल्पसंख्यांक दिवस असे अनेक दिवस साजरे केले जातात. उर्दू शाळेतील शिष्यवर्ती परीक्षेत २०२४ साली इ.५ वीत ५ पैकी दोन विद्यार्थी तर ८ वीत ५ पैकी २ विद्यार्थी पात्र ठरले. इ पाचवीतील १ विद्यार्थी मेरीट मध्ये आल्याने भारतदर्शन सहलीचा लाभ या विद्यार्थ्याला मिळाला, असे मुख्याद्यापिका सय्यद शहेदा जैनूलआबेदीन यांनी  सांगितले.

सहाय्यक आयुक्त थोरात यांनी शासनाच्या तसेच  आयुक्त शेखर सिंह निर्देशानुसार  आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये थेरगाव उर्दू शाळा महापालिकेच्या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेत असते. या शाळेतील १५ हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले असून त्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. नुकत्याच झालेल्या जल्लोष शिक्षणाचा   २०२३ या उपक्रमात यशवंतराव चव्हाण थेरगाव उर्दू शाळेला ५० लाखांचे बक्षीस मिळाले आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीनत शेख, यांनी मराठी अनुवाद बीबी हाजरा यांनी केले तर आभार कारीगर समीना यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button