Author: maharashtrabreakingnews.com

श्रीपाल सबनीस उद्घाटक, दादाभाऊ गावडे संमेलनाध्यक्ष तर वंदना आल्हाट स्वागताध्यक्ष रामदास काकडे यांच्या हस्ते भूमिपुत्र पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी (दि.५ जानेवारी २०२५) सकाळी आठ वाजता, देहू आळंदी रस्त्यावरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी, जय गणेश बँक्वेट हॉल, मोशी येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे संमेलनाध्यक्ष पद भूषवणार आहेत. तर स्वागत अध्यक्ष म्हणून वंदना हिरामण आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे अशी…

Read More

पनिशमेंट लघुपटाचे  लेखन- दिग्दर्शन अरुण काळे भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक जुनी म्हण आहे. आताच्या तीस-चाळीस किंवा त्याहीपेक्षा पुढील वयोगटाच्या पिढीने हे अनुभवलेले आहे. पूर्वी शाळेत शिक्षकाने एखाद्या विद्यार्थाला शिक्षा केली तर विद्यार्थालाही आपण केलेल्या चुकीबददल लाज वाटत असे तो घरी कळणार नाही याची खबरदारी घेत असे कारण घरीही तसेच होईल याची भीती त्याला असायची. जरी घरी पालकांना हे कळले तर त्यांनाही ती लाजीरवाणी गोष्ट वाटे व पाल्यालाच रागवत असत. यातून विद्यार्थी अत: मुर्ख होऊन आपल्यात बदल घडवत असे. अशा पिढीतील अनेक विद्यार्थी मीठे झाल्यावर आज आपले शिक्षक कुठेही…

Read More

प्रदूषित इंद्रायणी नदीचा मुद्दा तापला कारखाने, गृहप्रकल्प तसेच पालिकेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करा सबंधित आस्थापनांवर प्रसंगी फौजदारी खटले दाखल व्हावेत शिवसेना उपनेते  इरफानभाई सय्यद यांची ‘एमपीसीबी’कडे मागणी पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मध्यंतरी तत्कालिन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणीच्या प्रदुषणावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच नदी प्रदुषणमुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर काही प्रमाणात नदीचे फेसाळणे थांबले होते. पुन्हा आता नदी फेसाळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी वारंवार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांना कार्यवाहीबाबत निवेदन दिले…

Read More

माजी सैनिकांनी उद्योजक व्हावे – सतीश हंगे पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  माजी सैनिकांनी ज्याप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी सेवा केली. त्याचप्रमाणे सैनिकांनी सेवा निवृत्तीनंतर उद्योजक म्हणून कार्य करत; देशाचा आर्थिक विकास, सामाजिक उन्नती, प्रगती मध्ये हातभार लावावा असे मत जिल्हा सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी सतीश हिंगे यांनी व्यक्त केले.   भारतीय माजी सैनिक संघ, पुणे जिल्हा केंद्राची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, आकुर्डी खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि.२९) झाली. यावेळी बँक ऑफ बडोदाचे अधिकारी प्रवीण याज्ञिक, माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, ब्रिगेडियर डॉ. संजीव देवस्थळी (नि) बँक ऑफ बडोदा डिफेन्स बँकिंग ॲडवायसर…

Read More

– राज्यातील गो-रक्षकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि गोरक्षकांच्या मागण्यांसाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. तसेच, या पुढील काळातही गोसंवर्धनासाठी शेती-माती-संस्कृतीसाठी कटिबद्ध आहोत. कायदा असतानाही गोहत्या केली जात असेल, तर भगवाधारी महायुतीच्या सरकारमध्ये कुणाचेही लांगुलचालून करु देणार नाही. कायदा प्रत्येकाला पाळावा लागेल, असा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात महादेवाच्या नंदींचे व गोमातेच्या रक्ताचे वाहणारे पाट थांबवून शेतकरी समृद्ध व्हावेत. यासाठी पुण्याचे आराध्य दैवत भगवान श्री. ओंकारेश्वराच्या प्राचीन मंदिरात महाआरती करण्यात आली. राज्यातील गोरक्षक, गोभक्त आणि गोसेवकांच्या वतीने महादेवासमोर गोरक्षण व गोसंवर्धनासाठी संकल्प केला.…

Read More

महानगरपालिकेत रतन टाटा यांचे तैलचित्र आणि शहरामध्ये स्मारक उभारावे टीम पिंपरी चिंचवडची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – भारतात उद्योग विश्वाची पायाभरणी टाटा कुटुंबीयांमुळे झाली आहे. आज पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा जागतिक पातळीवर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखला जातो. पिंपरी चिंचवड मधील टाटा मोटर्स आणि राज्यातील टाटा कंपनीच्या इतर उद्योगामुळे महाराष्ट्र देशात नेहमीच उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. कामगारांप्रती आणि सामाजिक उत्तरदायित्व निभवण्यामध्ये देखील टाटा कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामध्ये रतन टाटा यांचे योगदान मोठे आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.     आमदार उमा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे पर्यटन दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन व लोकार्पण जुन्नर तालुक्याचे भूमीपुत्र व रायगड अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आळंदी येथील ज्ञानविलास काॅलेज आॅफ फार्मसीच्या सभागृहात पार पडला. जुन्नर तालुका शिवजन्मभूमी असून येथील गड, किल्ले जगातील सर्वात जास्त लेण्या, अष्टविनायकांपैकी दोन तिर्थक्षेत्र,पाच धरणे, जागतिक महाकाय दुर्बिण, अभिजात मराठी भाषेचा आद्यपुरावा असणारा नाणेघाटातील शिलालेख अशी वैशिष्ट्ये असणारा व जैवविविधता व निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका २०१८ साली पर्यटन झाला.महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेल्या या तालुक्यातील तरूणांनी, शेतकऱ्यांच्या उच्चशिक्षित मुलांनी याच्याकडे एक संधी म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.कोकणातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक बंदोबस्ताची योजना आखली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रात्रीपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरभर तैनात असणार आहे. नववर्षानिमित्त धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, मॉल्स, हॉटेल्स, लॉजेस आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्सवर वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून वाहन चालवणारे, भरधाव वाहन चालवणारे आणि सार्वजनिक ठिकाणी अराजकता माजवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. नववर्ष साजरी करताना मर्यादा ओलांडणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या घटना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय ,भोसरी ,पुणे 39 च्या वतीने आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन 17 व 18 मे 2025 रोजी पिंपरी- चिंचवड कवितेचा राजधानी मध्ये दिमाखात संपन्न होत आहे. या महाकाव्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी काव्य व कलाप्रेमी युवा आमदार शंकरभाऊ जगताप यांची एक मताने निवड करण्यात आली. यावेळी नक्षत्राचं देणं काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजेंद्र सोनवणे, सुप्रसिद्ध निवेदक व विचारवंत श्रीकांत चौगुले, अभियंता विजय कांबळे,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद घोगरे यांच्या शुभहस्ते निवडपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी निवड पत्र स्वीकारताना आमदार शंकर भाऊ जगताप म्हणाले की,”हा भव्य सोहळा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मासाळ यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडचे विद्यमान अध्यक्ष पराग कुंकूलोळ यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी २०२५ नविन पद नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघाचे नितीन शिंदे, बलभीम भोसले, महादेव मासाळ, मिलिंद संधान, संदिप सोनार, अतुल क्षीरसागर, योगेश गाडगे, संतोष चव्हाण, रामहरी केदार, औदुंबर पाडुळे तर ऑनलाईन द्वारे पराग कुंकूलोळ, जमीर सय्यद, सागर झगडे, हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते नविन कार्यकारिणीला संमती देण्यात आली.  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी खालीलप्रमाणे…

Read More