शिक्षक, विद्यार्थी, पालक यांतील संवेदनशील नातं सांगणारा ‘पनिशमेंट’ लघुपट लवकरच


पनिशमेंट लघुपटाचे लेखन- दिग्दर्शन अरुण काळे



भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक जुनी म्हण आहे. आताच्या तीस-चाळीस किंवा त्याहीपेक्षा पुढील वयोगटाच्या पिढीने हे अनुभवलेले आहे. पूर्वी शाळेत शिक्षकाने एखाद्या विद्यार्थाला शिक्षा केली तर विद्यार्थालाही आपण केलेल्या चुकीबददल लाज वाटत असे तो घरी कळणार नाही याची खबरदारी घेत असे कारण घरीही तसेच होईल याची भीती त्याला असायची. जरी घरी पालकांना हे कळले तर त्यांनाही ती लाजीरवाणी गोष्ट वाटे व पाल्यालाच रागवत असत. यातून विद्यार्थी अत: मुर्ख होऊन आपल्यात बदल घडवत असे. अशा पिढीतील अनेक विद्यार्थी मीठे झाल्यावर आज आपले शिक्षक कुठेही दिसले तर आदरयुक्त भीतीही बाळगतात, व कृतार्थ भावनेने पायाही पडून नमस्कार करतात. बरे झाले सर तुम्ही त्यावेळी मला शिक्षा दिली म्हणून मी योग्य दिशेला उभा आहे. अशीही भावना व्यक्त करतात. व त्या शिक्षकांना विसरत नाही.परंतु, आजची परिस्थिती बदललेली आहे. शाळा बदलल्या.. शिक्षण व्यवस्थेत बदल झाले, नियम बदलले,, धावपळीचे दिवस चालू आहेत, पाल्याला काहीही कमी पडू नये यासाठी पालकांची धावपळ चालू आहे, अशामध्ये आपला पाल्य कुठे चुकला तर प्रसंगी रागवतातही. त्याबद्दल अपेक्षाही भरपूर असतात.

सद्यपरिस्थितीमध्ये एखादया शिक्षकाने विद्यार्थास शिक्षा केली असता काही पालक सहन करत नाही प्रसंगी शिक्षकाशी वादविवाद …. सरतेशेवटी सदरील पालकांना तेव्हा जाग येते जेव्हा आपल्या पाल्याची मनस्थिती व भविष्य बिघडून गेलेले असते, व त्याला सावरणे कठीण होऊन बसलेले असते.अशाच आशयावर’ पनिशमेट’ नावाच्या लघुपटाची निर्मिती झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने अशोक पालवे,
केदार परमेश्वर, विघ्नेश रसाळ, दिपाली पाटील, मनीषा जुन्नरकर, प्रताप शिंदे, यांनी कामे केलेली आहेत.तर व्यंकटेश वाघमारे, अमेय बेंद्रे, प्रेम केदार, विश्वजित पालवे, यानी सहकलाकार म्हणून कामे केली आहेत.
लेखन- दिग्दर्शन अरुण काळे यांचे असून निर्मिती अरुण काळे यासह नितीन कांबळे, यांचे आहे. यासह
संकलन व्यंकटेश वाघमारे, संगीत व संत हांडीबाग, वेशभूषा – रंगभूषा प्रमोद कांबळे यांचे आहे.
सदरील लघुपटाला सहाय्य – निवृत्ती तापकीर, सारिका रसाळ, अनिल बेंद्रे, गणेश ढोले, संतोष अमृतवार,जयश्री पालवे, यांचे लाभलेले आहे.
ह्या लघुपटामध्ये कथेची सलग्न एक गीत चित्रित करण्यात आले आहे. त्या गीताचे गीतकार स्वप्नील
बिऱ्हाडे हे आहेत.








