जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे पर्यटन दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन व लोकार्पण सोहळा संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे पर्यटन दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन व लोकार्पण जुन्नर तालुक्याचे भूमीपुत्र व रायगड अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आळंदी येथील ज्ञानविलास काॅलेज आॅफ फार्मसीच्या सभागृहात पार पडला.



जुन्नर तालुका शिवजन्मभूमी असून येथील गड, किल्ले जगातील सर्वात जास्त लेण्या, अष्टविनायकांपैकी दोन तिर्थक्षेत्र,पाच धरणे, जागतिक महाकाय दुर्बिण, अभिजात मराठी भाषेचा आद्यपुरावा असणारा नाणेघाटातील शिलालेख अशी वैशिष्ट्ये असणारा व जैवविविधता व निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका २०१८ साली पर्यटन झाला.महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेल्या या तालुक्यातील तरूणांनी, शेतकऱ्यांच्या उच्चशिक्षित मुलांनी याच्याकडे एक संधी म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.कोकणातील लोकांनी रोजगार म्हणून राबवलेल्या होम सरकटे, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती,मत्स्योद्योग,कृषी पर्यटन तसेच जुन्नरची विशेष ओळख असणाऱ्या गोष्टींच्या चित्रफिती बनवून त्याचे शो,गाईड अशा विविध विषयांनी आपल्याकडे असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीतून व्यावसायिकता वाढवावी असे आवाहन सुनिल थोरवे यांनी केले.जुन्नर तालुक्यातील जागतिक महादुर्बिन ही आपल्यासाठी संजीवनी असून त्यातील लहरींना काही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रदूषण,धूर असणारे उद्योग या भागात सुरू करण्यास परवानगी मिळत नाही हे खरेतर जुन्नरची हवा शुद्ध राहण्यास वरदान आहे याचा फायदा आपण मेडिकल टुरिझममधील आरोग्यदायी निसर्गोपचारासाठी जुन्नरचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले पाहिजे. आपल्याला आपल्या मातीचे महत्त्व ओळखून जगाला सांगता आले पाहिजे.जगातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इथली वैशिष्ट्य समजावून सांगताना आपले चलन वाढविणे याबाबत जागरूकता येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब मटाले, योगेश आमले, सुनिल पाटे पाटील,उल्हास पानसरे,अॅड महेश गोसावी,शशिकांत आरोटे, धनंजय कुलवडे,विजय ढगे,मंगेश कुटे,सावळेराम भोर,इंद्रजीत पाटोळे, राहुल वाळुंज,अभिनंदन शिंदे,दिलीप मुळे, रविंद्र नलावडे,संदीप पाडेकर,सतिश आंबडेकर तसेच जुन्नर तालुका मित्र मंडळाचे पुणे, पिंपरी-चिंचवड मधील सभासद उपस्थित होते.

जुन्नर तालुका मित्र मंडळाचे मार्गदर्शक मुकुंद आवटे,शिवाजी चाळक, निलेश मुटके,अनिल गुंजाळ, बाळकृष्ण एरंडे, डॉ.योगेश गाडेकर, शरदचंद्र पवार आर्टस,काॅमर् महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पांडुरंग मिसाळ व कार्यालयीन अधिक्षक प्रविण भावे व्यासपीठावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.उपाध्यक्ष अॅड.संतोष काशिद यांनी स्वागत केले अध्यक्ष श्री.प्रभाकर ढोमसे यांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला.
प्रास्ताविक कोषाध्यक्ष दीपक सोनवणे तर कवी शिवाजी चाळक यांची जुन्नरच्या नाणेघाटातील अभिजात मराठी भाषेवरील मायमराठी ही कविता सादर केली.मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे,अनिल गुंजाळ, बाळकृष्ण एरंडे,स्नेहल भोर,दिपिका जंगम यांनी मनोगत व्यक्त केले.आभार शशिकांत आरोटे यांनी मानले.सचिव नवनाथ नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.








