आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्रमहाकाव्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार शंकर जगताप


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय ,भोसरी ,पुणे 39 च्या वतीने आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन 17 व 18 मे 2025 रोजी पिंपरी- चिंचवड कवितेचा राजधानी मध्ये दिमाखात संपन्न होत आहे.



या महाकाव्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी काव्य व कलाप्रेमी युवा आमदार शंकरभाऊ जगताप यांची एक मताने निवड करण्यात आली. यावेळी नक्षत्राचं देणं काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजेंद्र सोनवणे, सुप्रसिद्ध निवेदक व विचारवंत श्रीकांत चौगुले, अभियंता विजय कांबळे,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद घोगरे यांच्या शुभहस्ते निवडपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी निवड पत्र स्वीकारताना आमदार शंकर भाऊ जगताप म्हणाले की,”हा भव्य सोहळा आपल्या पिंपरीच्या शहरात संपन्न होत आहे. याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे महाकाव्यसंमेलन अतिशय देखणे आणि सुंदर करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. कवींसाठी गेले 25 वर्ष शहरांमध्ये व संपूर्ण महाराष्ट्रात सातत्यपूर्ण काम करणारे अतिशय क्रियाशील संस्था आहे. त्यांनी केलेले या बहुमानाचा मी स्वीकार करून सर्वपरीने सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी त्यांनी ग्वाही दिली.”
या दोन दिवसाच्या आठव्या अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्यसंमेलनात महाराष्ट्रातील सर्व कवी कवयित्रींना व विचारवंतांना विनामूल्य सहभाग असणार आहे. तसेच प्रत्येक सहभागीना काव्य सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. सहभागींना चहा, नाश्ता, भोजन व निवास व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाला आकर्षक सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या महाकाव्यसंमेलनासाठी महाकाव्यसंमेलन अध्यक्ष म्हणून बोल्ड कवी म.भा. चव्हाण हे उपस्थित राहणार आहे.
संपूर्ण हा सोहळा अतिशय दिमाखात संपन्न करण्याचा आयोजकाचा प्रयत्न आहे. काव्यग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, विविध परिसंवाद, विविध काव्य मैफल, प्रकट मुलाखत, काव्यसंग्रह प्रकाशन, स्मरणिका प्रकाशन या वेळी करण्यात येणार आहे. या महाकाव्यसंमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विचारवंत , कवी,साहित्यिक तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
या महाकाव्यसंमेलानाचे नियोजन गेले वर्षभर सुरू आहे. या भव्य सोहळ्याचे सर्व साक्षीदार होण्यासाठी पिंपरी चिंचवड नगरी सज्ज झाली आहे. अशी माहिती नक्षत्राचं देणं काव्यमंच या संस्थेच्या वतीने कळवण्यात आली आहे.








