Author: maharashtrabreakingnews.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा कायम सन्मान भाजपा सरकारनेच केला पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कॉँग्रेसच्या संविधान विरोधी काळाचा अस्त झाला असून भारतीय जनता पक्षाचे संविधान गौरव काल सुरू झाला आहे. भारताचे हे सर्वश्रेष्ठ संविधान युगानुयुगे जनतेला प्रेरणा आणि संरक्षण देत राहील. येत्या काळात भारत विश्वगुरु होणयासोबतच जगातली तिसरी महासत्ता बनणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी खंबीर नेतृत्व करत आहेत. भारताचे संविधान गौरव अभियान जनतेला प्रेरक ठरेल, संविधान गौरव अभियानाने जनतेचा आत्मविश्वास वाढणार असा आत्मविश्वास आज केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आज येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘संविधान गौरव अभियान’ च्या पुण्यातील सभेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने १७  ते १९  जानेवारी २०२५  या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या  ‘पर्पल जल्लोष – दिव्यागांचा महाउत्सव’ कार्यक्रमाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या दि १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.  केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या समारंभास  राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री  माधुरी मिसाळ, विधानपरिषदेच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महापालिकेच्या रुग्णालयामध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क, वसतिगृह शुल्क तसेच प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन अदा करणे,  १४ ई-बस खरेदीसाठी पीएमपीएमएल यांना ७ कोटी रुपये अनुदान वर्गीकरण करणे, महापालिकेच्या ई-लर्निंग  प्रकल्पाअंतर्गत शाळा आणि कार्यालयांना इंटरनेट बँडविड्थ सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती आणि महापालिका सभा यांची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर…

Read More

शासन आपल्या दारी कार्यक्रमाद्वारे २०५ लाभार्थींना पेन्शनपत्रांचे वाटप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय, मुळशी तहसील कार्यालय आणि संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आज (गुरुवारी) २०५ लाभार्थींना मंजूर पेन्शन पत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला तहसीलदार जयनाथ देशमुख, नायब तहसीलदार विशाखा काकडे, अन्नपुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर, मंडलाधिकारी बाबासाहेब साळुंखे, राजेंद्र जाधव, भीमाशंकर बनसोडे, वैभव भुतेकर, तलाठी सुरेखा लांडे, कविता पाठक, सुरेश बोरकर, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सागर आंगोळकर, युवा नेते तानाजी बारणे,  यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. एकूण ७५०० हून अधिक…

Read More

तंत्रज्ञानाच्या काळात अध्यात्माची नितांत गरज – स्वामी स्वरूपानंद सरस्वती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  ”सध्याच्या काळ तंत्रज्ञानाचा असून यामध्ये तरूण, मध्यमवर्गीय, ज्येष्ठांसह सर्वांनाच अध्यात्माची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येकाने समाजाला समाेर ठेवून आत्मविश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे”, असे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि.15) चिंचवड येथे आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. श्रुतिसागर आश्रमाच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी, नवनगर विद्यालयामधील मनोहर सभागृहात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणीचे बारा अभंगांवर माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या सुश्राव्य व्याख्यानमालेचे आयाेजन करण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना स्वामी स्वरूपानंद सरस्वती बाेलत हाेते. यावेळी श्रुतिसागर आश्रमातील सदस्यांसह विविध मान्यवर उपस्थित…

Read More

प्रभाग निहाय दौरा करत नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरांमधून सुरू केलेल्या जनसंवाद दौऱ्याला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. प्रभाग निहाय आमदार सुनील शेळके व त्यांचे कार्यकर्ते नागरिकांच्या घरापर्यंत जात त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांची लेखी निवेदने प्राप्त करून घेत आहेत. त्याप्रमाणे तात्काळ लोणावळा नगरपरिषद प्रशासन, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कामाबाबतचे निर्देश दिले जात आहेत. मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात विधानसभेला सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या लोणावळा शहरापासून आज करण्यात आली आहे. वलवन गावातून या दौऱ्याला सुरुवात…

Read More

संस्कार, सेवा व शिक्षा या त्रिसूत्रीवर शिक्षण देणारे गुरुकुल नगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांनी शिकवलेल्या संस्कार, सेवा व शिक्षा या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षण देणाऱ्या केडगाव येथील श्री आनंद पार्श्व गुरुकुलची नूतन भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. केडगाव अकोळनेर रोडवर 5 एकर प्रशस्त जागेत निसर्गाच्या सान्निध्यात आनंद नवकार परिवार ट्रस्टमार्फत भव्य गुरूकुलची उभारणी करण्यात येत असून या वास्तूचे भव्य उद्घाटन रविवार दि.19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. श्रमण संघीय युवाचार्य श्री महेन्द्रऋषिजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म.सा., प्रबुध्द विचारक श्री आदर्शऋषिजी म.सा., श्री हितेन्द्रऋषिजी म.सा.,…

Read More

संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून 11 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत समाजातील विविध घटकाना समाविष्ट करणार; राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवाची शानदार सुरुवात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय राज्यघटनेस 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देशव्यापी संविधान गौरव अभियान सुरू केले आहे. हे अभियान आता महाराष्ट्रातही सुरू झाले आहे. या अंतर्गत पुण्यात येत्या दोन दिवसांत जाहीर सभा होणार असून महाराष्ट्राच्या इतर भागातही सभा, उपक्रम घेण्यात येत आहेत. या माध्यमातून संविधानातील मूल्ये, विचारांचा प्रचार करून राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आगळी वेगळी आदरांजली वाहण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. *राज्यघटनेतील समतेच्या मूल्यानुसार देशाचे पंतप्रधान…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रीय बालिकादिनाचे औचित्य साधून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी आणि ब्रह्माकुमारी शिवशक्ती लीडरशिप ॲप्रोच (एस एस एल ए) इंडिया रिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीईंग दी बेस्ट व्हर्जन ऑफ यू’ या महिलांसाठी नि:शुल्क व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी कम्युनिटी सेंटर, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३:०० ते ५:०० या कालावधीत ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. भारत आणि नेपाळ स्तरावरील राजयोग मार्गदर्शिका ब्रह्माकुमारी डॉ. सुनीतादीदी आणि विभागप्रमुख ब्रह्माकुमारी  प्रवीणादीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी महिलांना मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. वय वर्षे अठरा आणि त्या पुढील महिलांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९२८४०४६२१९…

Read More

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “सर्वांचे प्रेम हेच माझ्या जीवनाचे संचित आहे!” असे कृतार्थ उद्गार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संत तुकारामनगर, पिंपरी येथे व्यक्त केले . सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने  आयोजित केलेल्या डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी डॉ. सबनीस यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून मुक्तसंवाद साधला. त्यापूर्वी, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते डाॅ. श्रीपाल सबनीस यांचा   सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोहम् सार्वजनिक…

Read More