ताज्या घडामोडीपिंपरी
भाजपाच्या देशव्यापी संविधान गौरव अभियानास महाराष्ट्रभर सुरुवात


संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून 11 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत समाजातील विविध घटकाना समाविष्ट करणार;
राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवाची शानदार सुरुवात
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय राज्यघटनेस 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देशव्यापी संविधान गौरव अभियान सुरू केले आहे. हे अभियान आता महाराष्ट्रातही सुरू झाले आहे. या अंतर्गत पुण्यात येत्या दोन दिवसांत जाहीर सभा होणार असून महाराष्ट्राच्या इतर भागातही सभा, उपक्रम घेण्यात येत आहेत.
या माध्यमातून संविधानातील मूल्ये, विचारांचा प्रचार करून राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आगळी वेगळी आदरांजली वाहण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. *राज्यघटनेतील समतेच्या मूल्यानुसार देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी हे बाबासाहेबांनी दाखविलेल्या समतेच्या मार्गावर चालत असून त्यांना तितकीच खंबीर व कणखर साथ देशाचे गृहमंत्री अमित शाह देत आहेत.
संविधानातील समतेचे मूल्य समाजात रुजावे याकरिता ‘संविधान गौरव अभियान’ अंतर्गत देशभर आणि महाराष्ट्र राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी स्वत: विशेष लक्ष ठेवून आहेत. संविधान गौरव अभियानाचे राज्यभराचे संयोजन विधान परिषदेचे सदस्य अमित गोरखे या समितीचे संयोजक या नात्याने करीत असून संपूर्ण राज्यभर या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात संविधान विषयक जागृती करण्याचे नियोजन आहे.*
उद्देश -संविधानप्रती लोकांची जागरूकता वाढविणे, संविधान लोकाना उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. समाजातील युवक वर्ग, बुद्धिजीवी वर्ग, महिला, अनुसूचित जाती यांना विशेषत्वाने सामील करून घेण्यात येणार आहे. या कालावधीत विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील या कालावधीतील नियोजित प्रमुख सभा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (ठाणे), ज्योतिरदित्य सिंधीया (पुणे), भूपेंद्र यादव (मुंबई), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर), नितीन गडकरी (छत्रपती संभाजीनगर).
युवा संपर्क अभियान :
विविध महाविद्यालये, वसतीगृहे आदि ठिकाणी ‘आमचे संविधान – आमचा अभिमान’ या विशेष कार्यक्रमातून विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येणार आहे. युवा मोर्चा यासाठी पुढाकार घेणार आहे. ‘नमो अॅप’ च्या माध्यमातून ऑनलाइन प्रश्नावली स्पर्धा आयोजन करण्याचा मानस आहे.
समाजाचा सहभाग :सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या नामवंत वक्ते, कार्यकर्ते यांचे परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध भागांत संविधान जागृती यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांवर विविध नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी याबाबत जनजागृती करणार आहेत.
युवा, महिला कार्यकर्ते, समाजातील विविध घटकामध्ये संविधान जागृतीपर उपक्रमांचे या कालावधीत पुणे आणि परिसरात आयोजन करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध स्मृतिस्थळांची जपणूक करून त्यांचे ‘ पंचतीर्थ’ मध्ये रूपांतर, 125 व्या जयंतीनिमित्त ‘संविधान दिवस’ घोषित, 2019 मध्ये अनुसूचित जाती – जमातींचे आरक्षण 10 वर्षे वाढविण्याची घोषणा, 2016 मध्ये अनुसूचित जाती – जमाती अत्याचार कायद्याचे संशोधन करून अधिक मजबूत करण्याचे काम यासारख्या ठळक कामानंतर आता संविधान गौरव अभियान हा भारतीय जनता पक्षाचा प्रमुख कार्यक्रम देश पातळीवर सुरू होत आहे.








