- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शंभर वर्ष होऊन गेले तरी भुशी गावाला गावठाण उपलब्ध नसल्याने तेथील घरांच्या नोंदी होत नव्हत्या. तसेच कोणत्याही जागेचा सिटीसर्वे देखील होत नव्हता. येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करत मार्गी लावला आहे. येत्या महिनाभरात गावातील सर्व घरांचा व त्यांच्या समोरील जागेचा सिटीसर्वे तयार होऊन त्याचे उतारे ग्रामस्थांना वाटप केले जाणार आहे. १६ जानेवारी रोजी भूमी अभिलेखच्या वतीने गावात सुनावणी घेत प्रत्येक ग्रामस्थांचे जागेची माहिती घेण्यात आली आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्त आमदार सुनील शेळके आज भुशी गावांमध्ये आले असताना सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भुशी ग्रामस्थांनी…
‘जागतिक उद्योजक परिषद २०२५’ मध्ये तज्ञांचा सहभाग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतामध्ये लोकसंख्येत वेगाने वाढ होत आहे. रोज नव्याने होणाऱ्या संशोधनामुळे तंत्रज्ञान देखील विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून वैद्यकीय, आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक व रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन अमेरिकेतील परफेक्ट व्हर्च्युअल टीमचे संस्थापक व सीईओ डॉ. सचिन देवी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘जागतिक उद्योजक परिषद २०२५’ च्या या परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त करताना डॉ. सचिन देवी बोलत होते. या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.19 जानेवारी) सायंकाळी पाच वाजता, चिंचवड मध्ये प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर (श्री बाळाप्पा महाराज मठ) यांच्या सहकार्याने यानिमित्त चिंचवडगाव, श्रीमंन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिर शेजारी देऊळ मळा येथे प्रथमच भव्य सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. यावेळी अक्कलकोट येथील गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले हे मार्गदर्शन करण्यात आहेत. तसेच आमदार शंकर जगताप, मंदार देव महाराज, डॉ. चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे, डॉ. गणेश दादा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटत आहे. दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचे काम सरकार करेल. त्यांना सक्षम बनविण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी विविध पावले उचलण्यात येतील. दिव्यांगांच्या कल्याणासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीतील ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करावा, याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल,’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ याकाळात ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हिंजवडी भागातील लक्ष्मी चौकात अनधिकृत पत्राशेड, बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पथकाकडून शुक्रवारी (दि.१७) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अनधिकृतपणे उभारलेले अनेक बांधकामावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाने कारवाई केली. या कारवाईमुळे निश्चितच या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याने रहदारीस अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या भागातील ५० पेक्षा अधिक अनधिकृत पत्राशेड, कठडे, सिमा भिंती, पक्की बांधकामे आदीवर शुक्रवारी (दि.१७) सकाळीपासून सांयकाळपर्यंत निष्कासनाची कारवाई पार पाडली. यावेळी…
आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत निर्णय शेतकऱ्यांना जमीन परतावा, वाकड क्रीडांगण, मेट्रो स्थानक नामांतराबाबतही चर्चा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, माण, म्हाळुंगे या भागात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून काही नवीन रस्त्यांचे नियोजन करण्याचा तसेच आवश्यक ठिकाणी पूल बांधून वाहतुकीचेही नव्याने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असताना पहिल्या शंभर दिवसांत राबवावयाच्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून आमदार जगताप यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयात महत्त्वाची…
नो-पार्किंग कारवाई थांबवण्याची मागणी, भारतीय जनता युवा मोर्चा लिगल सेल सक्रिय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील नो-पार्किंग क्षेत्रात सुरू असलेल्या गाड्यांवरील कारवाईच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा लिगल सेलने आवाज उठवला आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रतिनिधींनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोंबे यांना निवेदन सादर करून सदर कारवाई त्वरित थांबवण्याची मागणी केली. नो-पार्किंगचे फलक व स्पष्टता अभावामुळे नागरिक त्रस्त निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पिंपरी चिंचवडमधील नो-पार्किंग क्षेत्रांमध्ये नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कारवाई सुरू आहे. मात्र, या कारवाईत पारदर्शकतेचा अभाव आहे. फलकांवर योग्य माहिती नसल्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कारवाईच्या प्रक्रियेत गाड्या निष्काळजीपणे उचलल्या जात…
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक पूर्वतयारीमध्ये सहभागी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे झोनसह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो सेवादल स्वयंसेवक आणि भाविक भक्तगण सातत्याने आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे 400 एकरच्या विस्तीर्ण मैदानात शुक्रवार, दि.24 जानेवारी 2025 पासून हा तीन दिवसीय संत समागम सुरू होत असून, त्याची सांगता 26 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. मुख्य सत्संग कार्यक्रम दररोज दुपारी 2…
१९ जानेवारी रोजी तब्बल २५०० विद्यार्थ्यांना मिळणार महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कॉलरशिप – प्रा. नितीन बानुगडे पाटील पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “न घाबरता सतत अभ्यास… भरपूर सराव… स्वतःवर आणि आयआयबीवर विश्वास… हा यशाचा राजमार्ग आहे”. यशाचे रहस्य मागे न पडणे आणि अथक परिश्रम करणे हे आहे आणि जर तुम्ही ते पाळले तर डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचा तुमचा निर्धार सार्थ ठरेल. प्रेरणा आत्मविश्वास वाढवते आणि इच्छुकांना नवीन उत्साहाने त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करते, त्यासाठी सतत मेहनत करून मन स्थिर ठेवावे, असे प्रेरणादायी आवाहन प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे यांनी आयआयबीच्या ‘विजयी भव’ कार्यक्रमा मध्ये केले. महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी करिअर…
-“भक्ती-संस्कृती-परंपरा” थीमद्वारे देणार पर्यावरण रक्षणाचा संदेश – भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेली आणि इंद्रायणी नदी स्वच्छता अन् संवर्धनाबाबतचा संदेश देणारी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ यंदा महा कुंभमेळ्याला समर्पित केली असल्याचे भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या पुढाकाराने आणि अविरत श्रमदान, सायकल मित्र-पुणे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच यांच्यासह विविध पर्यावरण प्रेमी संस्था, संघटना आणि स्वयंसेवीवृत्तीने काम करणारे मान्यवर या सर्वांच्या पुढाकारातून ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात येते. भोसरीतील गाव जत्रा मैदानावर येत्या…
