नो-पार्किंग कारवाई थांबवण्याची भाजप युवा मोर्चा लीगल सेलची मागणी


नो-पार्किंग कारवाई थांबवण्याची मागणी, भारतीय जनता युवा मोर्चा लिगल सेल सक्रिय



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील नो-पार्किंग क्षेत्रात सुरू असलेल्या गाड्यांवरील कारवाईच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा लिगल सेलने आवाज उठवला आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रतिनिधींनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोंबे यांना निवेदन सादर करून सदर कारवाई त्वरित थांबवण्याची मागणी केली.

नो-पार्किंगचे फलक व स्पष्टता अभावामुळे नागरिक त्रस्त निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पिंपरी चिंचवडमधील नो-पार्किंग क्षेत्रांमध्ये नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कारवाई सुरू आहे. मात्र, या कारवाईत पारदर्शकतेचा अभाव आहे. फलकांवर योग्य माहिती नसल्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कारवाईच्या प्रक्रियेत गाड्या निष्काळजीपणे उचलल्या जात आहेत, तसेच नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात येत नाही.
*प्रमुख मागण्या*
युवा मोर्चाने निवेदनाद्वारे खालील मागण्या केल्या आहेत:
1. *जनजागृतीसाठी मोहिम:* १५-२० दिवस जनजागृती मोहीम राबवण्यात यावी, ज्यामुळे नागरिकांना नो-पार्किंग नियमांबद्दल योग्य माहिती मिळेल.
2. *पोलीस आयुक्तालयाचे पत्रक:* जनजागृतीसाठी पोलीस आयुक्तालयामार्फत पत्रक काढून ते शहरातील प्रमुख चौकांमध्ये लावण्यात यावे.
3. *फलक उभारणी:* नो-पार्किंग व पार्किंग क्षेत्रांसाठी स्पष्ट चिन्हे व दंडाच्या रकमेसह फलक उभारण्यात यावेत.
4. *कारवाई थांबवणे:* जनजागृती पूर्ण होईपर्यंत चालू असलेली दंडात्मक कारवाई थांबवण्यात यावी आणि वाहन उचलणे बंद करावे.
5. *वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:* जनजागृती मोहिम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवण्यात यावी.
*कारवाई न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा*
मागण्या पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या वतीने पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा लीगल सेल मी दिला आहे.
पोलीस आयुक्तांना निवेदन देताना भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे, पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस शिवम डांगे, मोहन राऊत, सचिव ऋषिकेश दुराफे, सरचिटणीस प्रदीप नाईक, लीगल सेल उपाध्यक्ष अमित चव्हाण, विद्यार्थी विभाग सह संयोजक प्रतीक रामगुडे, आदित्य रेवतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.








