चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
श्री समर्थांच्या पादुका दर्शन निमित्त चिंचवडमध्ये भव्य सामूहिक अग्निहोत्र


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.19 जानेवारी) सायंकाळी पाच वाजता, चिंचवड मध्ये प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर (श्री बाळाप्पा महाराज मठ) यांच्या सहकार्याने यानिमित्त चिंचवडगाव, श्रीमंन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिर शेजारी देऊळ मळा येथे प्रथमच भव्य सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. यावेळी अक्कलकोट येथील गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले हे मार्गदर्शन करण्यात आहेत. तसेच आमदार शंकर जगताप, मंदार देव महाराज, डॉ. चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे, डॉ. गणेश दादा शिंदे, हनुमंत गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच चिंचवड गावातील अध्यात्मिक क्षेत्रातील काही मान्यवर आणि गजानन विजय ग्रंथ २१ अध्याय मुखोद्गत असणारी कन्या सुरभी सुनील ढगे (वय ८ वर्षे) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या सामूहिक अग्निहोत्र साठी सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कोणतेही साहित्य, वस्तू सोबत आणू नये. अग्निहोत्र व सामग्री देण्यात येणार येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे सर्वांना मुक्त प्रवेश असून श्री स्वामी समर्थांच्या भक्तगणांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनच्या वतीने केले आहे.








