- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती, हरगुडेवस्ती, जाधववाडी या परिसरात महानगरपालिकेने कलम ५३ अन्वये केलेल्या निष्कासन कारवाईमध्ये लघुउद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पालिकेने केलेल्या कारवाईनंतर राडारोडा तसाच आहे. काही लघुउद्योजकांच्या मशीन अस्ताव्यस्त जागेवर पडलेल्या आहेत. उद्योजकांना इतर ठिकाणी भाड्याने जागा मिळालेल्या नाहीत. उद्योजक सध्याच्या परिस्थितीत जागा विकत घेऊ शकत नाहीत. कारवाईच्या खर्चाचा बोजा जागा मालकाच्या सातबाऱ्यावर टाकून तो उद्योजकाकडून वसूल केला जाणार आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शुक्रवारी (दि. २१) रोजी भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी बैठकीत विविध मुद्द्यांवर…
सांगवी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- स्वादिष्ट व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उसळलेली खवय्यांची गर्दी आणि शोभेच्या वस्तू, विविध प्रकारचे वस्त्र आणि महिलांची आभूषणे, लहान मुलांची खेळणी व फॅन्सी ड्रेस, विविध पुस्तकांचे स्टॉल्स तसेच मसाल्याचे पदार्थ आणि गृहउपयोगी व चैनीच्या वस्तू खरेदीसाठी मोठा जनसागर पवना थडी जत्रेत आलेला पहायला मिळाला. याशिवाय विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत पवनाथडी जत्रेचे आयोजन कारण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी (२२ फेब्रुवारी ) सायं. ६ वाजता ‘मेरा भारत महान’ या सदाबहार हिंदी, मराठी गाण्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादर झाला. यावेळी मेरा भारत महान या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने रविवार, दिनांक २३ फेब्रुवारी ते गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पाच दिवसीय शिवशंभो महाशिवरात्री महोत्सव २०२५चे शाहूनगर, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमाला, शिवशंभो कार्यभूषण आणि कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा, चित्रकला – रांगोळी – विविध गुणदर्शन आणि समूहगान स्पर्धा, भजन – कीर्तन, शिवलीलामृत ग्रंथ पारायण, ओंकार संगीत संध्या-अभंग व भक्तिगीते, महाप्रसाद अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, अमित गोरखे, सदाशिव खाडे, अभय कोटकर, आयुक्त शेखर सिंह, बापूसाहेब बांगर, राजेश खन्ना, नितीन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिघी येथील माजी सैनिक विकास संघासाठी भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून दहा संगणक भेट देण्यात आले आहेत. माजी सैनिक विकास संघातर्फे अभ्यासिका चालवली जाते. या अभ्यासिकेला आमदार लांडगे यांनी भेट दिली होती यावेळी अभ्यासिकेसाठी संगणक देण्यात येतील असे शब्द आमदारांनी दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला. याशिवाय माजी सैनिकांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असल्याची भावना यावेळी आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. दिघी येथे मोठ्या प्रमाणात माजी सैनिक वास्तव्याला आहेत. या माजी सैनिकांच्या माध्यमातून माजी सैनिक विकास संघ कार्यरत आहे. या विकास संघा तर्फे अभ्यासिका चालवली जाते या अभ्यासिकेचे कामकाज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्याने, या भागातील ५८ खाजगी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्लॅन्ट्स पूर्वी बंद करण्यात आले होते. मात्र, पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने ठराविक अटी व शर्तींसह या प्लॅन्ट्सना पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत. महानगरपालिकेच्या अटी व शर्ती: १) खाजगी “आरओ” प्लॅन्ट चालक (Reverse Osmosis Plant Operator) यांनी महानगरपालिकेकडे रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रभागातील कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा यांचेकडे अर्ज करावा.…
आठवले यांच्या हस्ते अजंठा नगर एसआरए प्रकल्पाचे भूमिपूजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांना ३०० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी सर्वप्रथम मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती. आता कुटुंबाचा आकार वाढल्यामुळे एसआरए अंतर्गत विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये ४५० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२२) चिंचवड येथील अजंठा नगर एसआरए प्रकल्प टप्पा ३ चे भूमिपूजन आणि बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.…
शशिकांत झिंजुर्डे गटला मोठा धक्का, तर कर्मचारी वर्गामध्ये आनंद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची दि.22/02/2025 वार शनिवार रोजीची वार्षिक सर्वसाधारण सभा मा.औद्योगिक न्यायालयनाने रद्द केली असल्याचे आपला महासंघाचे बाळासाहेब कापसे यांनी सांगितले. यामुळे या सर्वसाधारण सभेत मतपेटीव्दारे मतदान न घेता पुढील महासंघाची कार्यकारणी मोजक्या कर्मचारी वर्गातून निवडली जाणार होती. ती आता रद्द झाल्यामुळे कर्मचारी वर्गानी सुटकेचा श्वास सोडला आहे. 7 फेब्रुवारी रोजी कर्मचारी महासंघाच्या विद्यमान कार्यकारणीकडून दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभे मध्ये कलम 11 नुसार पुढील तीन वर्षाची महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांची निवड केली जाणार…
पालिका निवडणुकांबाबत 25 फेब्रुवारीला सुनावणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या तसेच तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने 25 फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली आहे. यावेळी महापालिकांतील प्रभाग रचनेच्या मुद्दय़ावर राज्य सरकार युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे या सुनावणीत पालिका निवडणुकांचा मुहूर्त ठरतोय की लांबणीवर पडतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जानेवारीत झालेल्या सुनावणीवेळी गुंता सुटण्याची चिन्हे होती. मात्र राज्य सरकारने पुन्हा वेळकाढू भूमिका घेतली. त्यामुळे सुनावणीचे घोंगडे भिजत पडले आणि मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम राहिली. निवडणुकीचे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर कार्यतालिकेवर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील महिला बचत गटांना सक्षम करण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वाटा महत्वपूर्ण असून देश सक्षमीकरण करताना महिलांचे सक्षमीकरण करणे देखील गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘पवनाथडी’ जत्रेचे उदघाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आणि आमदार उमा खापरे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार आण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रिया बनसोडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे,सागर आंघोळकर, धनराज बिर्दा,माजी नगरसदस्या माई काटे, सविता खुळे,उषा मुंढे, चंदा लोखंडे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्षे चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी सुरू करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही आणखी दोन अधिकाऱ्यांना शासनाच्या मूळ जागी पाठविण्याची कार्यवाही आयुक्त योगेश म्हसे यांनी केली आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि नगर रचना विभागामध्ये सुरू असलेल्या अनियमित कामांमुळे आयुक्तांनी दोन दिवसात चार जणांना कार्यमुक्त केले आहे. राहुल दिवेकर (कनिष्ठ रचना सहाय्यक) आणि विवेक डुब्बेवार (शाखा अभियंता) या दोघांना तत्काळ कार्यमुक्त केले. नगररचना विभागामध्ये बांधकाम नोंदणी त्याचप्रमाणे विविध परवानगी दिली जाते. नागरिकांची कामे होत नसल्याबाबत यापूर्वीच आयुक्तांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. त्यामध्ये एकमेव नगररचना विभागामध्ये…
