Author: maharashtrabreakingnews.com

– स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे आज पुरस्कार वितरण – पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी- प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी धर्मरक्षण, राष्ट्रहित, सेवा व शौर्य या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन मंडळातर्फे गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे १७ वे वर्ष असून, या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आज 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात येणार आहे. मंडळातर्फे यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार उत्तरप्रदेश मधील सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी असा परिसर स्वच्छ करून तेथे ‘सेल्फी पॉईंट’ केले जात आहेत. अशा जागांवर सेल्फी काढण्यासाठी नागरिकांचीही लगभग वाढू लागली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक जागा कचरामुक्त करीत तो परिसर सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ येथील संजीवनी बिल्डींग कॉर्नर येथील परिसर कचरामुक्त करत तो परिसर सुशोभित केला आहे. कचऱ्यातील टाकाऊ टायरचा तसेच झाकणाचा वापर करत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी परिसर कचरामुक्त करत सुंदर ‘सेल्फी पाईंट’ तयार केलाय. तसेच आजबाजूच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे १ मार्च २०२५ पासून जापनीज एन्सेफलायटीस अर्थात ‘जेई’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘जेई’ हा विषाणूजन्य आजार असून, तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांना होतो. या आजारामुळे गंभीर मज्जातंतू विकार होण्याची शक्यता असते, तसेच याचा मृत्यूदरही अधिक आहे. ‘जेई’ सिंड्रोम हा देशातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. कारण यामुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे, आणि ३०-४० टक्के बरे झालेल्या मुलांमध्ये विशिष्ट परंतु मज्जातंतूशी संबंधित अपंगत्व आयुष्यभर राहते. त्यामुळे या आजारापासून बचावासाठी लसीकरण करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे. लसीकरण…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाळेच्या भिंती केवळ चार भिंती नसतात, तर त्या ज्ञान, सर्जनशीलता आणि प्रेरणांचा खजिना असतो. या भिंती आता ‘बोलक्या भिंती’ या उपक्रमामुळे बोलक्या झाल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची, विचार करण्याची आणि स्वतःच्या कल्पनांना रंग देण्याची संधी देत आहेत. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची सर्जनशीलता विकसित व्हावी आणि शाळेचे वातावरण अधिक आनंददायी व्हावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या चिंचवड येथील मरहूम फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेमध्ये आकांक्षा फाऊंडेशन व शाळा व्यवस्थापन समितीच्या १५ सदस्यांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर बोलक्या भिंती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जनसंवाद सभेत आज ९८ तक्रार वजा सूचना नागरिकांनी मांडल्या. शहरातील नागरीक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलद गतीने करण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात समन्वय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येते. या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान नेमण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी भूषवले. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरीकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तक्रारी वजा सूचना मांडल्या. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ८,१४,४, २६, ८,८,१३ आणि १७ याप्रमाणे एकुण ९८ तक्रारी वजा सुचना नागरिकांनी मांडल्या. आज झालेल्या जनसंवाद सभेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता हस्तांतरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यासह विविध सेवांचा लाभ आता शहरातील नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे. यासाठी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, डिजीलॉकर, नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य, व आपले सरकार पोर्टल यांच्यातील आवश्यक असणारे डेटा शेअरिंग इंटिग्रेशन पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कागदविरहित आणि नागरिकांभिमूख प्रशासनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातील डेटा शेअरिंग इंटिग्रेशन पूर्ण झाल्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील मालमत्ता हस्तांतरण ऑनलाइन पद्धतीने शक्य झाले आहे. मालमत्ता खरेदीदारांना आता मालमत्ता हस्तांतरणासाठी महानगरपालिकेत स्वतंत्रपणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमानतेसह विहित कालमर्यादेत देण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश व‍िकास प्राधिकरणात तातडीने पाऊले उचलली जात आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या हद्दीत एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) लागू असलेले क्षेत्रासह या व्यतिरिक्त सद्यस्थितीत प्राधिकरणाची २०१८ ची नियमावली लागू असलेले उर्वरित क्षेत्रात विकास परवानगी / जोते / भोगवटा व इतर परवाने निर्गत करण्याची प्रक्रिया दि. २६/०२ /२०२५ पासून ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्याचा न‍िर्णय महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला आहे. बांधकाम परवानगी प्रक्रियेचे एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली UDCPR नुसार प्रमाणन करण्याच्या दृष्टिने बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली (BUILDING PLAN MANAGEMENT SYSTEM -BPMS) हे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ न्यूज १४ मिडीया आयोजित पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025, उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, उद्योजकता आणि आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. पुरस्कार वितरणावेळी बोलताना पद्मश्री मुरलीकांत पेटकर म्हणाले, “अशा पुरस्कार सोहळ्यांमुळे नवोदितांना प्रेरणा मिळते आणि आपल्या कार्यावर विश्वास वाढतो. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान नवी उमेद देतो.” कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी मनोगत व्यक्त करत सोहळ्याविषयी बोलताना सांगितले की , “शहराच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा…

Read More

निगडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने निगडी प्राधिकरणातील श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०७:१५ वाजता गंगाआरती आणि रात्री ठीक ०८:०० वाजता गंगाकलश स्नान या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र काशी विश्वेश्वर येथील विद्वान पंडित – महाराजांची विशेष उपस्थिती राहील. याशिवाय महाशिवरात्री २०२५ या महोत्सवात बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपासून गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :- पहाटे ०५:३० वाजता रुद्राभिषेक, सकाळी ०७:३० वाजता…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ‘स्वतःला जाणून घेण्याचे विज्ञान म्हणजे अध्यात्म होय!’ असे प्रतिपादन इस्त्रोतील माजी कर्मचारी आणि ज्येष्ठ योगसाधक रिता कलावार यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव २०२५ अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेतील ‘विज्ञान व अध्यात्म’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना रिता कलावार बोलत होत्या. ज्येष्ठ उद्योजक नितीन काकडे, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, शामराव मोरे, किशोर सूर्यवंशी, विजय महल्ले, सोमनाथ कुईटे, शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे, अध्यक्ष संजय तोरखडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून, ”इवलेसे रोप लावियले…

Read More