Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९:३० वाजता, राज ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, मनसे शहाराध्यक्ष सचिन चिखले, मनसे पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष सीमाताई बेलापूरकर, सचिव रुपेश पटेकर, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, विशाल मानकरी, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, मयूर…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सक्षमा प्रकल्पाअंतर्गत शहरातील सक्रीय महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत आहे. याशय त्यांना मालमत्ता कर संकलन, नवी दिशा, अग्नि सुरक्षा सर्वेक्षण यांसारख्या महापालिकेच्या विविध उपक्रमात सहभागी करून घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच बचत गट मॉल यांसारख्या संकल्पना राबवून त्यांना कायमस्वरूपी स्वत:चा हक्काचा व्यवसाय सुरू करून देणे हा यामागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी सक्षमा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात सहभागी महिला बचत गटांसाठी महिला दिनाचे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छतेबरोबर शहरातील सार्वजनिक जागा कचरामुक्त करून त्या कल्पकतेने सजवण्यास प्राधान्य देत आहे. भोसरी येथील हुतात्मा विजय साळसकर मार्गावरील गुडविल चौकात सार्वजनिक जागी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी येथील सार्वजनिक जागेचे महानगरपालिकेकडून सुशोभिकरण करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे काम करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २० येथील हुतात्मा विजय साळसकर मार्गावर गुडविल चौक आहे. या चौकाजवळ असणारी सार्वजनिक जागा कचरायुक्त झाली होती. ती जागा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून कल्पकतेने सजवण्यात आली असून ती कचरामुक्त करण्यात आली आहे. या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले असून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी व लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे,डॉ. श्रीपाल सबनीस, विश्वास मोरे, पितांबर लोहार, कृषिभूषण सुदाम भोरे, ऍड. सतीश गोरडे, प्रदीप गंधालीकर, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, प्राचार्य प्रो.(डॉ.) पांडुरंग भोसले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी संस्थेमार्फत दिल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महानगरपालिका ड क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सामान्य विक्रेत्यांवर कारवाई करून विक्रीचे कपडे, साहित्य,फळे,भाजी विक्रेत्यांचे टेम्पो सह इतर साहित्य जप्त करण्यात आले ते नाशवंत माल खराब झाला आणि जप्त वस्तू परत दिले जात नाहीत म्हणून आज फेरीवाल्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाभवन गेट समोर आंदोलन केले. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे केलेल्या आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, शहर पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, अलका रोकडे, किसान भोसले,सलीम डांगे, निमंत्रक अविनाश ब्याडगिरे, सुनील भोसले,पवन मानकरे ,मंगेश सावरकर, मुझमिल काझी, सोमनाथ नांदूरकर, देविदास शिंदे, रवी गडदरे,प्रवीण दबे, गणेश सुरवसे,विनायक मुळे,कृष्णा वाघमारे, सोहेल शेख,मोहम्मद रिजवान, पूजा लोखंडे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज पिंपरी न्यायालयातील पुरुष बार रूम येथे दि पुणे लॉयर्स कंज्युमर्स् को- ऑप. सोसायटीच्या चेअरमन व संचालक मंडळाने भेट देत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या. लॉयर्स कंज्युमर्स् को- ऑप. सोसायटीची स्थापना १९६१ मध्ये झालेली असून वकिलांसाठी विविध सुविधा अल्पदरात या सोसायटीमार्फत पुरवल्या जात असून देशातील वकिलांसाठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून नावाजलेली आहे. यावेळी उपस्थित वकिलांनी सोसायटीमार्फत ऑनलाइन पेमेंट ची सुविधा, वकिलांसाठी वेगळी रांग, मुबलक स्टॅम्प पुरवठा, मनुष्यबळ वाढवणे, ई फाइलिंग अशा विविध समस्या व सूचना संचालक मंडळापुढे मांडल्या. यावेळी सोसायटीचे विद्यमान चेअरमन ॲड. हेमंत गुंड यांनी वरील सर्व समस्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मातंग साहित्य परिषद -पुणे ,स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ -निगडी,समरसता गतीविधी-पिंपरी-चिंचवड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी दि.९ मार्च २०२५ सायं. ६.३० वा कॅप्टन जी.एस.कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, -निगडी येथे .”स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक चळवळीतील विचारसूत्रे”या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीशजी प्रभुणे हे असणार आहेत. तर या परिसंवादात केंद्रीय भटके विमुक्त आयोगचे माजी अध्यक्ष: पद्मश्री दादा इदाते, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार प्रदीपदादा रावत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू व सुप्रसिध्द वक्ते सात्यकी सावरकर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महावितरणने एमआरसीकडे प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने विरोध केला आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात विजेचे दर हे सर्वाधिक आहेत अशी वस्तुस्थिती असताना आता पुन्हा महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे ( MERC) खुल्या व छुप्या पद्धतीने वीज दरवाढ मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला असून त्यावर सुनावणी होण्यास सुरुवात झालेली आहे. आताच्या प्रस्तावित दरवाढीत पुढील मुद्दे चिंताजनक आहेत. 1. स्थिर आकारात वाढ 2. वीज दरात वाढ 3. WHEELING CHARGES मध्ये वाढ 4. TOD – TIME OF DAY TARIFF चे धोरण 5. GRID SUPPORT CHARGES मध्ये वाढ 6. GREEN TARIFF…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमधील घटनांमधून आपल्याला व्यवस्थापन, नियोजन, नीती, समाजकारण, राजकारण याविषयी मार्गदर्शन मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपल्याला अडचणीच्या काळात संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक आहे. जिजाऊ मासाहेब, येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचे पराक्रमी चरित्र आजच्या काळातील तरुण पिढीने समजून घेऊन आपले करिअर घडवण्यासाठी त्यातून प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन श्रीनिवास हिंगे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून हिंगे यांचे व्याख्यान आणि लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, ग्रंथपाल स्वाती सातपुते, अनघा कुलकर्णी, डॉ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग सक्षमा प्रकल्पांर्गत महिला दिनानिमित्त महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.५ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. पिंपरी कॉलनी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणाऱ्या या मेळाव्यात सक्षमा प्रकल्पातील महिलांना सहभागी होता येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे या मेळाव्यामध्ये स्वयं सहाय्यता बचत गटांना मार्गदर्शन करणार आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे ‘स्वयं सहाय्यता बचत गट पुढील वाटचाल’ या…

Read More