ताज्या घडामोडीपिंपरी

महावितरणने MERC कडे प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचा विरोध

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महावितरणने एमआरसीकडे प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने विरोध केला आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात विजेचे दर हे सर्वाधिक आहेत अशी वस्तुस्थिती असताना आता पुन्हा महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे ( MERC) खुल्या व छुप्या पद्धतीने वीज दरवाढ मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला असून त्यावर सुनावणी होण्यास सुरुवात झालेली आहे.

आताच्या प्रस्तावित दरवाढीत पुढील मुद्दे चिंताजनक आहेत.

1. स्थिर आकारात वाढ

2. वीज दरात वाढ

3. WHEELING CHARGES मध्ये वाढ

4. TOD – TIME OF DAY TARIFF चे धोरण

5. GRID SUPPORT CHARGES मध्ये वाढ

6. GREEN TARIFF CHARGES मध्ये वाढ

7. FAC – FUEL ADJUSTMENT CHARGES मध्ये वाढ

8. LT उद्योगांना KVAH BILLING मुळे वाढ

9. LT उद्योगांना PFC – POWER FACTOR INCENTIVE चा लाभ नाही. त्यामुळे लघुउद्योग, MSME, COTTAGE INDUSTRIES व START UPS उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होणार.

10. ROOF TOP SOLAR धारकांना LOAD FACTOR INCENTIVE आता मिळणार नाही. SOLAR वापरणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

11. BULK CONSUMPTION मधील सवलत रद्द होणार आहे. ज्यांचा वीज वापर जास्त आहे त्यांना मिळणारी सवलत आता रद्द होणार आहे.

12. वरील सर्व बाबींवर ELECTRICITY DUTY पण वाढणार आहे, त्यामुळे वीज ग्राहकाना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

महाराष्ट शासनाचे औद्योगिक विकासाला चालना देण्याचे धोरण असताना महावितरण मात्र वारंवार वीज दरवाढ करून या धोरणास बाधा आणत आहे. वीज चोरी, वीज गळती, TRANSMISSION LOSSES, विद्युत निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता, प्रशासकीय खर्च, खाजगी कंपन्याकडून वीज विकत घेणेचे दर, आदी महत्वाच्या मुद्द्यावर प्रभावी मनुष्यबळ व्यवस्थापनाद्वारे महावितरणने यंत्रणा सुधारणेसाठी लक्ष केंद्रित करावे व कार्यक्षमता वाढवून आर्थिक शिस्त आणणे गरजेचे आहे. वरील कळीच्या मुददयांकडे डोळेझाक करून वारंवार वीज दरवाढ करणे हा उपाय घातक आहे असे आमचे ठाम मत आहे.

देशामध्ये महाराष्ट राज्य औद्योगिकरणात आजही अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे कर संकलन व रोजगार निर्मिती प्रचंड होत असून देशाच्या विकासाला महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अशा औद्योगीकरणाला महावितरणने रास्त दरात वीज उपलब्ध करून हातभार लावणे आवश्यक आहे.

वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून महावितरणने प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघानेचा प्रखर विरोध असून महावितरणने ती पूर्णपणे रद्द करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button